शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

न्यायालयाची प्रतीक्षा संपली

By admin | Updated: February 26, 2015 00:06 IST

इमारतीचे काम पूर्ण : दोडामार्गमधील न्यायालयीन काम होणार सोयीस्कर

वैभव साळकर - दोडामार्ग  - ‘तालुका तेथे न्यायालय’ या शासनाच्या धोरणानुसार दोन वर्षांपूर्वीच बांधून पूर्ण झालेल्या सुसज्ज अशा दोडामार्ग न्यायालयाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा आता संपली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनिल जोशी व जिल्हा सत्र न्यायाधीश सुनील कोतवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत २८ फेब्रुवारीला उद्घाटन होणार असून, प्रत्यक्षात ‘आॅर्डर...आॅर्डर...’ असा आवाज २ मार्चपासून दोडामार्ग तालुक्यातील या न्यायालयात घुमणार आहे. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका न्यायालयातील अद्वितीय अशी इमारत असून तिचे बांधकाम दर्जेदार व पुढील पन्नास वर्षांचा विचार करून करण्यात आले आहे. युती शासनाच्या कालावधीत २७ जून १९९९ ला दोडामार्ग तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर दोडामार्ग तालुका शासकीय कार्यालयांच्या प्रतीक्षेत होता. सुरुवातीला शासकीय गोदामात तहसीलदार कार्यालय सुरू केल्यानंतर इतर कार्यालये हळूहळू तालुका ठिकाणी सरू झाली खरी, मात्र, न्यायालयाची प्रतीक्षा काही संपली नव्हती. शासनाच्या ‘तालुका तेथे न्यायालय’ या धोरणानुसार चार वर्षांपूर्वी दोडामार्ग न्यायालयासाठी साधारपणपणे चार कोटी रुपयांच्या इमारतीला मंजुरी देण्यात आली. या इमारतीचे काम अरविंद देशपांडे व यशवंत आठलेकर यांनी दर्जेदार तसेच कमी कालावधीत पूर्ण करण्याची किमया केली. तालुक्यातील इतर शासकीय कामांच्या तुलनेत न्यायालयाचे काम कितीतरी उजवे असून, ते मॉडेल म्हणून पुढे आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायाधीश व सावंतवाडी तालुका न्यायाधिशांच्या देखरेखीखाली सार्वजनिक बांधकाम खात्याने दर्जेदार काम पूर्ण करून दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. साधारणपणे चार कोटीच्या या इमारतीचे बांधकाम पुढील पन्नास वर्षांचा विचार करून करण्यात आले आहे. दोडामार्गसाठी स्वतंत्र न्यायालय झाल्याने सावंतवाडी न्यायालयात प्रलंबित असलेले येथील खटले लवकरात लवकर मार्गी लागण्यास मदत होईल. शिवाय जनतेला सावंतवाडीला जाण्यासाठी सहन करावा लागणारा मनस्तापही यामुळे कमी होण्यास मदत होईल.- अ‍ॅड. प्रवीण नाईक,वकील, दोडामार्गदोडामार्ग तालुक्याचे स्वतंत्र न्यायालय सुरु होणार असल्याने येथील जनतेला सहन करावा लागणारा त्रास वाचणार आहे. पूर्वी सावंतवाडीला जाण्यासाठी वेळ, पैसा व श्रम बरेच लागायचे मात्र, दोडामार्गला न्यायव्यवस्था आल्याने नक्कीच तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने ही एक जमेची बाजू असून जनतेसाठी फायदेशीर ठरणार आहे.- जे. बी. सूर्यवंशी, पोलीस निरीक्षकतालुकास्तरीय न्यायालयात सर्वोत्कृष्टस्वतंत्र निवास व्यवस्थादोन मजली इमारतीमध्ये एकूण बावीस हजार स्क्वेअर फिट बांधकाम करण्यात आले असून, त्यामध्ये दोन कोर्ट हॉल, कर्मचारी कार्यालये, स्टेनो रुम, लोक अदालत, लायब्ररी, मेडिएशन रुम, वकिलांसाठी महिला व पुरुष असे दोन वकील चेंबर, उपाहारगृह, न्यायाधिशांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था अशी रचना करण्यात आली आहे.दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झालेल्या न्यायालयाच्या इमारतीत प्रत्यक्षात कामकाज कसे सुरू होणार, याबाबत प्रतीक्षा होती. इमारत व निधीचे काम पूर्ण झाले असून आता शासनाने निधीची तरतूद व एक न्यायाधीश तसेच इतर चौदा कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.