शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

मालवणातील नौदल दिनाच्या कार्यक्रमाचे काऊंट डाऊन सुरू, व्हाईस अ‍ॅडमिरल संजय भल्ला यांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 13:18 IST

मुख्य शामियाना, पुतळ्याची जागा, निवास व्यवस्था आदींची केली पाहणी

मालवण: मालवण येथे होणाऱ्या भारतीय नौदल दिनाच्या कार्यक्रमाचे काऊंट डाऊन सुरू झाले असून वेस्टर्न नेव्हल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ व्हाईस अ‍ॅडमिरल संजय भल्ला यांनी मालवणला भेट देत कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या सोबत इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे अधिकारीही उपस्थित होते. तारकर्ली एमटीडीसी समोरील किनाऱ्यावर नौदलाचा मुख्य कार्यक्रम होणार असून याठिकाणी भव्य शामियाना उभारण्यात येणार आहे. याच शामियान्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील उच्च पदस्थ अधिकारी, मंत्रीगण उपस्थित असणार आहेत. सायंकाळी ५:३० वाजता मोदींची शामियान्यात एन्ट्री झाल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी राजकोट येथील शिवछत्रपींच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. एमटीडीसी किनाऱ्यावर शामियान्याच्या कामाला सुरुवात तारकर्ली एमटीडीसी समोरील समुद्रात भारतीय नौदलाकडून कसरती आणि कवायती सादर केल्या जाणार आहेत. याच ठिकाणी नौदलाच्या ड्रील पथकाचे चित्तथरारक सादरीकरण, विविध प्रकारच्या कसरती, मार्कोस कमांडोंचे बचावकार्य, समुद्री बचाव मोहिमा यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे. संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद असलेला हा क्षण पाहण्यासाठी आणि नौदलाची मानवंदना स्वीकारण्यासाठी येथे उभारण्यात येणाऱ्या शामियाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल, देशातील उच्च पदस्थ अधिकारी आणि मंत्रीगण उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मालवण येथील कार्यक्रमासाठी दुपारी नौदलाच्या हेलिकॉप्टर मधून बोर्डिंग ग्राऊंडवर उतरणार आहेत. तेथून ते राजकोट येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी राजकोट येथे जाणार आहेत. पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर तारकर्ली येथे नौदलाच्या सायंकाळी ५:३० वाजता होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदी ज्या ठिकाणीं थांबणार आहेत त्या ठिकाणांची संजय भल्ला यांनी पाहणी केली. संजय भल्ला यांनी रविवारी राजकोट येथे उभारण्यात येणाऱ्या शिव छत्रपतींचा पुतळ्याच्या कामाचा आढावा घेतला. यानंतर तारकर्ली येथे झालेल्या आढावा बैठकीत एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, कोकण विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज, उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर, ऐश्वर्या काळुसे, चिपी विमानतळाचे संचालक किरण कुमार, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील, तहसीलदार वर्षा झाल्टये आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग