शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक गेले शिवसेनेत; फटाके फोडले भाजपने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 17:10 IST

Bjp Shivsena Sindhudurg- वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीतील भाजपच्या सहा माजी नगरसेवकांनी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपतर्फे येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

ठळक मुद्देनगरसेवक गेले शिवसेनेत; फटाके फोडले भाजपने! वैभववाडी शहरात कार्यकर्त्यांचा जल्लोष; शहरवासीय संभ्रमात

वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीतील भाजपच्या सहा माजी नगरसेवकांनी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपतर्फे येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. तर त्या माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही फटाक्यांची आतषबाजी केली. दोन्ही पक्षांनी फटाके वाजविल्यामुळे काही काळ शहरवासीय संभ्रमात पडले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ६ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशाच्या काही मिनिटे अगोदर भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते कार्यालयातून जोरदार घोषणाबाजी करीत संभाजी चौकात पोहोचले. तेथे त्यांनी भाजपचा विजय असो; उडाले ते कावळे, राहिले ते मावळे; नीतेश राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.यावेळी तालुकाध्यक्ष नासीर काझी, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, शारदा कांबळे, सुधीर नकाशे, भारती रावराणे, हुसेन लांजेकर आदी उपस्थित होते.शहरातील नागरिकांना ते सहाही नगरसेवक नकोसे झाले होते. त्यामुळे स्वत:हून पक्षातून गेले ते बरे झाले. ते गेल्यामुळे आमचा पक्ष स्वच्छ झाला आहे. ते गेल्याने पक्षावर कोणताही परिणाम होणार नसून येत्या नगरपंचायत निवडणुकीत १७ ही नगरसेवक भाजपचेच निवडून येतील. जे पक्षातून गेले त्यांना आमदार नीतेश राणेंनी निवडून आणले होते. त्यांनी त्यांच्याशी गद्दारी केली. ते गेल्यामुळेच आम्ही आनंदोत्सव साजरा केला, असे मत नासीर काझी यांनी व्यक्त केले.फटाक्यांबाबत शहरात चर्चासहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संभाजी चौकातच फटाक्यांची आतषबाजी करीत पक्षप्रवेशाचे स्वागत केले. परंतु दोनदा फटाके फुटल्यामुळे लोकांना मात्र नेमके कोणी, कशासाठी फटाके वाजवले, हे कळलेच नाही. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वाजविलेल्या फटाक्यांची मात्र चर्चा झाली. 

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्ग