CoronaVirus कोकण रेल्वेकडून पावणे दोन कोटींचा निधी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 11:09 PM2020-03-30T23:09:55+5:302020-03-30T23:10:02+5:30

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर उचलले पाऊल 

CoronaVirus Two crore funds received from Konkan Railway to pm re leaf fund hrb | CoronaVirus कोकण रेल्वेकडून पावणे दोन कोटींचा निधी 

CoronaVirus कोकण रेल्वेकडून पावणे दोन कोटींचा निधी 

Next

कणकवली :  कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे भारत आणि जगभरातील सद्यस्थिती गंभीर बनली आहे . त्यामुळे  या विषाणूला आळा घालण्यासाठी आणि सर्वांना आवश्यक वस्तू पुरवण्यासाठी भारत सरकार विविध प्रयत्न करीत आहे . त्यास पाठिंबा म्हणून कोकण रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. कोरोनाच्या विरुद्ध राष्ट्राच्या लढाईत मदत करण्यासाठी अतिरिक्त पाऊल म्हणून कोकण रेल्वेने सीएसआर फंडांकडून  १ कोटी आणि कर्मचार्‍यांच्या एका दिवसाच्या मूलभूत वेतनातून ७८ लाख ५० हजार रुपयांचे  योगदान दिले आहे.
      पंतप्रधान सहाय्यता निधीस आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत म्हणून हा निधी देण्यात आला आहे. कोकण रेल्वेने हे पाऊल उचलून कोरोना व्हायरसच्या विरोधात राष्ट्राच्या लढाला पाठिंबा दर्शविला आहे. अशी माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल .के . वर्मा यांनी दिली आहे.

Web Title: CoronaVirus Two crore funds received from Konkan Railway to pm re leaf fund hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.