शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
4
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
5
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
6
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
7
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
8
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
9
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
10
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
11
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
12
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
13
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
14
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
15
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
16
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!
17
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
18
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "निलेश लंके तू किस झाड की पत्ती है..." अजित पवार यांचा इशारा
20
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'

CoronaVirus :एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 12:09 PM

शासन आणि प्रशासनाचे प्रतिकुल धोरण, एसटीच्या आर्थिक परिस्थितीवर झालेला परिणाम यासह विविध अडचणींचा विचार करून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे, असे मत मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देएसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे !हनुमंत ताटे यांचे मत; कामगारांना दिलासा देण्याची मागणी

कणकवली : शासन आणि प्रशासनाचे प्रतिकुल धोरण, एसटीच्या आर्थिक परिस्थितीवर झालेला परिणाम यासह विविध अडचणींचा विचार करून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे, असे मत मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी व्यक्त केले आहे.

सर्व सामान्य जनतेच्या लालपरीने आता ७३ व्या वर्षात पदार्पण केले आहे . गेल्या ७२ वर्षामध्ये महामंडळाने अनेक चढउतार पाहिले , अन्याय सहन केले , परंतू प्रवाशी सेवेचे व्रत सोडले नाही. आता कोरोनाच्या संकटामुळे लालपरीच्या चाकाची गती काहीशी रोखली गेली आहे .१ जून १९४८ मध्ये केवळ ३६ बेडफोर्ड गाड्यांच्या सहाय्याने निरनिराळ्या १५० मार्गांवर एसटी महामंडळाची वाहतूक सुरू झाली .  हळहूळ या वाहतूकीचा विस्तार होऊन १ ९७४-७५ मध्ये महाराष्ट्रात प्रवाशी वाहतूकीची संपूर्णपणे राष्ट्रीयीकरण झाले. आज रोजी महामंडळ संपूर्ण राज्यात १८००० गाड्यांच्या सहाय्याने दररोज सुमारे ६५ लाख प्रवाशांची वाहतूक सेवा करत आहे . रस्ता तेथे एसटी या उद्दिष्टपूर्तीचा तसेच ग्रामीण व दुर्गम भागात प्रवाशी सेवेचा विस्तार करण्याचा ध्यास घेत राज्य परिवहन महामंडळाने मोलाचे योगदान दिले आहे .त्यामुळेच आज एसटी महामंडळास राज्याची जीवनवाहिनी मानले जाते. मात्र आज एसटी महामंडळास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे . विविध पथकरांच्या ओझ्याखाली महामंडळ दबले आहे. प्रवाशी सवलतीची प्रतिपूर्ती शासनाकडून वेळेवर होत नाही .डिझेलच्या दरात होणारी वाढ , टायर व सुट्या भागांच्या किंमतीत झालेली वाढ , अवैध प्रवाशी वाहतूक यामुळे एसटी महामंडळ २०१२-१३ पासून तोट्याच्या दिशेने गेले . २०१४ पासून २०१९ -२० पर्यंत तोटा १६८५ कोटींवरून साडेपाच हजार कोटींपर्यंत गेला आहे .सध्या कोरोना संकटामुळे एसटी वाहतूक गेले अडीच महिने पूर्णपणे ठप्प आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक सुरू असली तरी महामंडळास ती परवडत नाही. त्यामुळे महामंडळाचा आर्थिक तोटा आणखी वाढला आहे . प्रतिकूल परिस्थितीत एसटी महामंडळाचे कामगार काम करत आहेत .कामगारांचे वेतनही वेळेवर होत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून एसटीच्या उत्पन्नवाढीकरता शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे . एसटी महामंडळाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी एसटी महामंडळ राज्यशासनात विलीन करण्याची गरज आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून त्यांच्याप्रमाणेच वेतन व भत्ते दिले पाहिजेत. तसे केल्यास राज्यातील सामान्य जनतेस किफायतशीर दरात दर्जेदार प्रवाशी वाहतूक सेवा उपलब्ध होईल शिवाय एसटी कर्मचाऱ्यांनाही चांगले दिवस येतील असेही हनुमंत ताटे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग