शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोना संदर्भात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी २५ औषधांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 15:05 IST

कोरोना संदर्भात जागतिक आरोग्य संघटना तसेच आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा आणि विविध देशातील होमिओपॅथी तज्ज्ञांनी दिलेल्या औषधांचा अभ्यास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांसाठी कार्य करण्याच्या उद्देशाने वेंगुर्ला येथील सुप्रसिद्ध डॉक्टर श्रीराम हिर्लेकर यांनी जिल्ह्यातील नामवंत होमिओपॅथी तज्ज्ञांचा अभ्यासगट स्थापन केला आहे.

ठळक मुद्देनामवंत होमिओपॅथी तज्ज्ञांचा अभ्यासगट स्थापनश्रीराम हिर्लेकर यांच्या नेतृत्वात डॉक्टर एकवटले

वेंगुर्ला : कोरोना संदर्भात जागतिक आरोग्य संघटना तसेच आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा आणि विविध देशातील होमिओपॅथी तज्ज्ञांनी दिलेल्या औषधांचा अभ्यास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांसाठी कार्य करण्याच्या उद्देशाने वेंगुर्ला येथील सुप्रसिद्ध डॉक्टर श्रीराम हिर्लेकर यांनी जिल्ह्यातील नामवंत होमिओपॅथी तज्ज्ञांचा अभ्यासगट स्थापन केला आहे.

आॅनलाईन चर्चेद्वारे आणि विविध तज्ज्ञांची मते विचारात घेऊन या अभ्यासगटाने काही होमिओपॅथीक औषधांचा अभ्यास केला आहे. त्यानुसार २५ औषधे निवडली असून त्याद्वारे प्रतिकारशक्ती वाढून कोरोनाला आळा बसेल असा दावा या टीमने केला आहे.होमिओपॅथी ही समलक्षण चिकित्सा पद्धती असून तिचा मुख्य उद्देश आजाराविरुद्ध लढण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविणे हा आहे. अनेक व्यक्तींना एकच आजार झाला असेल तरी त्यांची लक्षणे व्यक्तीनुसार थोडीफार वेगळी असू शकतात. त्यामुळे कोरोनावर एकच औषध सर्वांसाठी नसून त्या व्यक्तीच्या लक्षणांनुसार औषध देता येईल. भारतातील विशेषत: मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या लक्षणांचा बारकाईने अभ्यास करून उपयुक्त ठरतील अशी सुमारे २५ औषधे या टीमने निवडली आहेत.कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्याची संधी मिळाल्यास योग्य ती औषधे देता येऊ शकतील. आयुष मंत्रालयाने अर्सेनिक अल्बम ३० हे औषध रोगप्रतिबंधक असल्याचे सांगितले आहे. होमिओपॅथी केंद्रीय संशोधन परिषदेने सादर केलेल्या अहवालानुसार भारतात विलगीकरण केलेल्या सुमारे ३ हजारांहून अधिक लोकांना काही दिवस अर्सेनिकचे डोस दिल्यानंतर ९९ टक्के व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे सिंधुदुर्गात कोरोनाबाधित रुग्ण किंवा विलगीकरण कक्षात ठेवलेल्या व्यक्तींना त्यांच्या आणि सरकारच्या संमतीने होमिओपॅथी उपचार देण्याचा आपला मानस असल्याचे या अभ्यास गटाने सांगितले आहे. या अभ्यास गटामध्ये डॉ. निलेश पेंडुरकर, डॉ. मंदार नानल (कणकवली), डॉ. प्रशांत सामंत (कुडाळ), डॉ. स्नेहल गोवेकर, डॉ. रेवती लेले (सावंतवाडी), डॉ. एस. एम. कुंभार (आरोंदा) आदींचा समावेश आहे.आरोग्य सेतू अ‍ॅप प्रत्येकाने डाऊनलोड करावेइतर कोणत्याही व्यक्तीला रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे औषध हवे असेल त्याने जवळच्या होमिओपॅथी डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली औषध घ्यावे.होमिओपॅथीमध्ये कोरोनावर कोणतेही ब्रॅण्डेड औषध उपलब्ध नाही. कुणीही फसव्या जाहिरातींना बळी पडू नये.ज्या व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी किंवा यकृताचे आजार असतील अशा आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच आरोग्य सेतू हे अ‍ॅप प्रत्येकाने डाऊनलोड करून घ्यावे. तुम्ही बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला असाल तर लगेच सूचना मिळण्यासाठी आरोग्य सेतू अ‍ॅप प्रत्येकाने डाऊनलोड करण्याचे आवाहनही या अभ्यासगटाने केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गMedicalवैद्यकीय