शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

CoronaVirus Lockdown : लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या मजुरांना घेऊन धावली लालपरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 16:44 IST

लॉकडाऊनमुळे तिथवली येथे अडकून पडलेल्या झारखंड येथील २३ मजुरांना वैभववाडी येथून एसटी बसने ओरोस येथे नेण्यात आले. ओरोसहून विशेष रेल्वेने जिल्ह्यातील झारखंड येथील मजुरांना झारखंडमध्ये सोडण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. तालुक्यातील या परप्रांतीय कामगारांना घेऊन दुपारी ही एसटी बस ओरोसकडे रवाना करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपरप्रांतीयांना पास देण्याचे प्रशासनाचे नियोजनबिहारमधील ३१२ कामगार रवाना

वैभववाडी : लॉकडाऊनमुळे तिथवली येथे अडकून पडलेल्या झारखंड येथील २३ मजुरांना वैभववाडी येथून एसटी बसने ओरोस येथे नेण्यात आले. ओरोसहून विशेष रेल्वेने जिल्ह्यातील झारखंड येथील मजुरांना झारखंडमध्ये सोडण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. तालुक्यातील या परप्रांतीय कामगारांना घेऊन दुपारी ही एसटी बस ओरोसकडे रवाना करण्यात आली आहे.गेले दोन अडीच महिने लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या या कामगारांच्या चेहऱ्यावर घरी जाण्याची ओढ दिसत होती.तालुक्यातील रस्ते काम, बांधकाम, क्रशर, धरणांची कामे अशा ठिकाणी झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यातील मजूर काम करतात. लॉकडाऊनमुळे काम बंद असून आता पावसाळाही जवळ आल्यामुळे या सर्व कामगारांना घराची ओढ लागली आहे.परप्रांतीयांना पास देण्याचे प्रशासनाचे नियोजनअनेक परप्रांतीय मजूर ई-पास साठी तहसील कार्यालयात हेलपाटे मारीत आहेत. बिहार येथे जाणारे काही कामगारही पास मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात आले होते. परप्रांतीय मजुरांची नोंदणी करून त्याप्रमाणे त्यांना त्यांच्या गावी जाण्याचे नियोजन प्रशासन करीत आहे.बिहारमधील ३१२ कामगार रवानासावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातून बिहारमधील ३१२ कामगारांना ओरोस येथील रेल्वे स्थानकावर सोडण्यात आले. या सर्व कामगारांना निरोप देण्यासाठी सावंतवाडी बस स्थानकावर प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्यासह तहसीलदार राजाराम म्हात्रे आले होते. वैद्यकीय पथकेही बसस्थानकावर तैनात करण्यात आली होती.सावंतवाडी तालुक्यातून बिहारकडे जाण्यासाठी ३१२ कामगारांची नोंदणी झाली होती. या सर्व कामगारांना सोमवारी सकाळी येथील बस स्थानकावर बोलविण्यात आले. त्यानंतर सर्व एसटी बस् मधून ३१२ कामगार ओरोस रेल्वे स्थानकाकडे रवाना झाले. सायंकाळच्या सुमारास हे सर्व कामगार बिहारकडे रवाना झाले.या सर्व कामगारांना निरोप देण्यासाठी सावंतवाडी बस स्थानकावर प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्यासह तहसीलदार राजाराम म्हात्रे आले होते. तसेच वैद्यकीय पथकेही बसस्थानकावर तैनात करण्यात आली होती. त्याशिवाय कामगारांना बसमध्ये खाद्यपदार्थही देण्यात आले होते. कामगारांनी याबाबत प्रशासनाचे आभार मानले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग