देवगड : आंध्रप्रदेश येथून देवगड येथे भूगर्भ सर्वेक्षणासाठी आलेल्या भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्थेच्या ११ जणांना बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास रवाना करण्यात आले. या सर्वांची आरोग्य तपासणी करून त्यांना आंध्रप्रदेश येथील मूळगावी पाठविण्यात आले. यावेळी तहसीलदार मारुती कांबळे, तलाठी उदय गुरव आदी उपस्थित होते.जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यांतील मजूर, विद्यार्थी तसेच कामगारांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्थेचे ११ कर्मचारी फेब्रुवारी महिन्यात भूगर्भ सर्वेक्षणासाठी देवगडमध्ये आले होते. त्यांचे पडेल ते तिर्लोट या किनारपट्टी भागात भूगर्भ सर्वेक्षण सुरू होते. लॉकडाऊनमुळे हे सर्व कर्मचारी देवगड येथे अडकले होते.या कर्मचाऱ्यांना देवगड येथून त्यांच्या आंध्रप्रदेश येथील मूळगावी रवाना करण्यात आले. याबद्दल जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासह तहसीलदार मारुती कांबळे, नायब तहसीलदार प्रिया परब व प्रशासनाचे त्या कर्मचाऱ्यांनी आभार मानले.
CoronaVirus Lockdown : आंध्रप्रदेशमधून आलेल्या त्या ११ जणांची रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 17:30 IST
आंध्रप्रदेश येथून देवगड येथे भूगर्भ सर्वेक्षणासाठी आलेल्या भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्थेच्या ११ जणांना बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास रवाना करण्यात आले. या सर्वांची आरोग्य तपासणी करून त्यांना आंध्रप्रदेश येथील मूळगावी पाठविण्यात आले. यावेळी तहसीलदार मारुती कांबळे, तलाठी उदय गुरव आदी उपस्थित होते.
CoronaVirus Lockdown : आंध्रप्रदेशमधून आलेल्या त्या ११ जणांची रवानगी
ठळक मुद्देआंध्रप्रदेशमधून आलेल्या त्या ११ जणांची रवानगीदेवगड येथे अडकले भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्थेचे पदाधिकारी