शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

CoronaVirus Lockdown :चिरेखाणीवरच्या कामगारांच्या पेटल्या चुली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 17:16 IST

संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्यावतीने १५ दिवसासाठी लागणारा किराणा माल, धान्य,भाज्या उपलब्ध करून दिल्या.पोलीस ठाण्यातच निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या उपस्थितीत अन्नधान्याचे वाटप त्या कामगारांना केले. त्यामुळे चिरेखाणीवरच्या कामगारांच्या चुली पुन्हा पेटल्या आहेत.

ठळक मुद्देउपाशी असलेल्या कामगारांना संदीप मेस्त्री मित्रमंडळाने दिले अन्नधान्य कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी घेतला पुढाकार

सुधीर राणे

कणकवली  : 'आम्ही चिरेखाणीवर रोजंदारी वर काम करतो.. धान्य साठा संपला आहे...झोपडीत आता अन्नाचा कणसुद्धा नाही...'एकतर आम्हाला धान्य द्या , नाहीतर गावी जाण्याची परवानगी द्या . अशी कौफिय असरोंडी येथील एका चिरेखाणीवर काम करणाऱ्या दहा कामगारांनी कणकवली पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे मांडली. ही गोष्ट कणकवली कलमठ येथील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कळली.

त्यांनी संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्यावतीने १५ दिवसासाठी लागणारा किराणा माल, धान्य,भाज्या उपलब्ध करून दिल्या.पोलीस ठाण्यातच निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या उपस्थितीत अन्नधान्याचे वाटप त्या कामगारांना केले. त्यामुळे चिरेखाणीवरच्या कामगारांच्या चुली पुन्हा पेटल्या आहेत.कणकवली तसेच मालवण तालुक्याच्या सिमेवरील असरोंडी गावातील चिरेखाण काम करणारे १० कामगार किराणा माल नसल्याने कणकवली पोलिस स्थानकांत गावी जाण्यासाठी परवानगी मागण्यासाठी आले होते. संचारबंदी असल्याने आहे त्या जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास बंदी आहे . मात्र, चिरेखाणीच्या ठिकाणी राव्हायचे असेल तर या कामगारांकडे अन्न नव्हते. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्या कामगारांनी कणकवली पोलीस ठाणे गाठले.पोलीस ठाण्यात झालेली गर्दी पाहून काही कार्यकर्ते तेथे गेले असता त्यांना कामगारांची समस्या लक्षात आली . या गरजूंना मदतीचा हात देत संदीप मेस्त्री मित्रमंडळाने पंधरा दिवस पुरेल इतके धान्य उपलब्ध करून दिले . तसेच माणुसकीचे दर्शन घडविले.कणकवली पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या उपस्थितीत त्या दहा गरजूंना मदत वितरित करण्यात आली.यावेळी संदीप मेस्त्री,पोलिस पाटिल संतोष जाधव, नितिन पवार, विट्ठल चव्हाण,अभी साटविलकर,समीर कवठणकर, केतन दळवी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस