शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कणकवली बाजारपेठेत पुन्हा एकदा उसळली गर्दी, पावसाळ्याची बेगमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 18:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील मंगळवारी होणारा आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय तालुका व्यापारी संघ व प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या आठवडा बाजाराच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी व दुसऱ्या दिवशी म्हणजे विविध साहित्य खरेदी करण्याच्या उद्देशाने कणकवली बाजारपेठेत नागरिकांनी पुन्हा एकदा गर्दी केली होती.

ठळक मुद्देकणकवली बाजारपेठेत पुन्हा एकदा उसळली गर्दी, पावसाळ्याची बेगमी विविध साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारपेठेत दाखल

कणकवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील मंगळवारी होणारा आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय तालुका व्यापारी संघ व प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या आठवडा बाजाराच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी व दुसऱ्या दिवशी विविध साहित्य खरेदी करण्याच्या उद्देशाने कणकवली बाजारपेठेत नागरिकांनी पुन्हा एकदा गर्दी केली होती.जीवनावश्यक वस्तूंसह पावसापासून बचाव करण्यासाठी प्लास्टिक व इतर साहित्य खरेदी केले जात होते. कणकवली शहरात बुधवारी सकाळपासूनच नागरिकांनी विविध साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. बाजारपेठेतील अनेक दुकानेही उघडण्यात आली होती.बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी करणाºया ग्राहकांना कोरोना विषाणूची भीती नसल्याचे अनेकवेळा दिसून येत आहे. कारण प्रशासन विविध माध्यमातून कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन करीत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. संधी मिळताच बाजारपेठेत नागरिकांकडून गर्दी होत आहे.दरवर्षी मान्सून दाखल होत असतानाच शेतकरी तसेच इतर नागरिक पावसाळ्यात आवश्यक अशा जीवनावश्यक वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात करीत असतात. त्यामध्ये कांदे, मसाला अशा वस्तूंचा समावेश असतो. शेतकरी एकदा शेतीच्या कामात गुंतला की त्याला खरेदीसाठी कणकवलीसारख्या बाजारपेठेत भर पावसात येणे शक्य होत नाही.यावर्षी मिरगाचा बाजार नाही!कोकणात पावसाळ्याची बेगमी केली जाते. शेतीसाठी आवश्यक साहित्यही खरेदी केले जाते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने आठवडा बाजार बंद केल्याने अनेक नागरिकांची गैरसोय झाली. त्यात मिरगाचा आठवडा बाजारही झाला नाही. त्यामुळे आठवड्यातल्या इतर दिवशी बाजारपेठेत हजेरी लावून खरेदी केली जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग