शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus :आंब्याची स्वत:च विक्री करून नव्या पॅटर्नची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 12:33 IST

देवगड हापूस आंब्याच्या हंगामाच्या सुरूवातीलाच यावर्षी कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण देशासमोर उभे राहिले. मात्र, कोकणातील शेतकरी, बागायतदार कधीही आलेल्या संकटातून खचून जात नाही. तो आत्महत्येचा मार्ग स्वीकारत नाही. याची प्रचिती देखील आंबा व्यावसायिकांनी करून दिली. आलेल्या संकटाला तोंड देत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत बागायतदारांनी आपल्या बागांमधील आंबा स्वत:च विक्री करुन एकनवा पॅटर्नची निर्मिती केली. कोरोना संकटामुळे देवगड मधील आंबा बागायतदार आत्मनिर्भय बनले.

ठळक मुद्देआंब्याची स्वत:च विक्री करून नव्या पॅटर्नची निर्मितीसंकटावर केली मात, देवगडमधील आंबा बागायतदार बनले आत्मनिर्भर

अयोध्याप्रसाद गावकरदेवगड : देवगड हापूस आंब्याच्या हंगामाच्या सुरूवातीलाच यावर्षी कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण देशासमोर उभे राहिले. मात्र, कोकणातील शेतकरी, बागायतदार कधीही आलेल्या संकटातून खचून जात नाही. तो आत्महत्येचा मार्ग स्वीकारत नाही. याची प्रचिती देखील आंबा व्यावसायिकांनी करून दिली. आलेल्या संकटाला तोंड देत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत बागायतदारांनी आपल्या बागांमधील आंबा स्वत:च विक्री करुन एकनवा पॅटर्नची निर्मिती केली. कोरोना संकटामुळे देवगड मधील आंबा बागायतदार आत्मनिर्भय बनले.संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतामध्ये या विषाणूने मार्च महिन्यामध्येच शिरकाव केला. त्यामुळे देशामध्ये २२ मार्च पासून लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे ऐन आंबा मौसमातच बागायतदारांसमोर मोठे संकट उभे राहिले.

बाजारपेठा बंद, वाहतूक बंद, लोक घरांमध्ये अडकून पडलेले मग आंब्याची विक्री करायची कशी? त्यातच सर्वात मोठी स्थानिक बाजारपेठ असलेले नवीमुंबईतील वाशी मार्केट बंद झाल्याने आंबा बागायतदारांसमोर एक आव्हानच निर्माण झाले. मात्र, विदर्भ मराठवाड्यातील शेतक-यांप्रमाणे कोकणातील शेतकरी कधीही खचून जात नाही. कोकणातील शेतक-यांनी कर्जापोटी किवा नापिक शेत झाल्यामुळे आत्महत्या केल्याची नोंद नाही. त्यामुळे त्या इतिहासाची पुनरावृत्ती करून बागायतदारांनी कोरोनावर मात केली.दलाली संपुष्टातदेवगडमधील आंबा बागायतदारांनी स्वत:च्या मालाची स्वत:च विक्री करुन महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या शहरांमधील मागणी नुसार घरपोच आंबा पेटीचा पुरवठा केला आहे. यामुळे आंबा विक्रेचे शेतकरी ते थेट ग्राहक असे समीकरण बनले. या समीकरणाने दलाली पूर्णपणे संपुष्टात आली. त्याचा फायदा थेट आंबा बागायतदारांना झाला आहे.

स्वत: पिकविलेला माल स्वत:च विक्री केल्यामुळे आंबा बागायतदारांचे मनोधैर्य, आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. कोकणी शेतक-यांच्या पाठीशी व आंबा बागायतदारांच्या पाठीवर हात थोपटणारे राजकीय पाठबळ नसताना सुध्दा कोकणातील शेतकरी व बागायतदार कधीही खचून गेलेला नाही, हे त्याने सिद्ध केले.आंबा पेटीला सर्वाधिक भावयावर्षी लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होणार हे दिसत होते. मात्र, या संकटासमोर येथील बागायतदार हे ध्येयाने उभे राहिले. कोरोना विषाणूच्या काळातही आंब्याच्या पेटीला चांगला भाव मिळाला. आतापर्यंतच्या इतिहासात तो सर्वाधिक होता.शेकडो टन आंब्याची मुंबई, पुणेत विक्रीदेवगडसह जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदारांनी शासनाकडून अत्यावश्यक सेवेतील परवाना मिळवून कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळातही मुंबई, ठाणे, नवीमुंबई, पुणे, कोल्हापूर या सारख्या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण संस्थांमध्ये आंब्याची विक्री केली आहे. या थेट आंबा विक्रीमुळे त्याचा फायदा स्थानिक बागायतदार, शेतकऱ्यांना झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग