शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करा, निमाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 17:15 IST

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांबाबत तातडीने निर्णय घेऊन या परीक्षा रद्द कराव्यात अशी विनंती महाराष्ट्र स्टुडंट फोरमच्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने (निमा) नाशिक विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्दे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करा, निमाची लेखी निवेदनाद्वारे मागणीकोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने विद्यार्थी चिंताग्रस्त

सावंतवाडी : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांबाबत तातडीने निर्णय घेऊन या परीक्षा रद्द कराव्यात अशी विनंती महाराष्ट्र स्टुडंट फोरमच्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने (निमा) नाशिक विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

पहिली सुरक्षा नंतर परीक्षा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. जर आपण सुरक्षेची हमी देत नसाल तर परीक्षा रद्द कराव्यात, अशी विद्यार्थ्यांची मागणी असल्याचे म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री, कुलसचिव, परीक्षा नियंत्रक मंडळ, आयुर्वेद संचालक, आयुर्वेद अधिष्ठाता यांना पाठविल्या आहेत.महाराष्ट्र स्टुडंट फोरमने पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोविड-१९ च्या वैश्विक महामारीमुळे देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोरोना बाधित रुग्णांची संख्या आहे.अशा परिस्थितीमध्ये सर्व आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये अतिशय प्रामाणिकपणे काम करीत आहेत. परंतु कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी चिंताग्रस्त झालेले आहेत. अद्यापही विद्यापीठाने परीक्षेसंदर्भात परीक्षा घेणार अथवा नाही याबद्दल विद्यार्थ्यांना कल्पना दिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची तसेच पालकांची संदिग्ध अवस्था झालेली असून चिंता वाढली आहे.स्टुडंट फोरम, महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्रातील आयुर्वेद तसेच इतर वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला आहे. हा संवाद साधताना विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भात निमा स्टुडंट फोरम, महाराष्ट्र राज्याकडे काही मागण्या केल्या आहेत. त्या सर्व मागण्या लेखी निवेदनाद्वारे सादर केल्या आहेत.या मागण्यांमध्ये वैद्यकीय शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असेल तर वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी सोशल डिस्टन्स परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे पाळावयाचे आहे तसेच परीक्षा केंद्रावर काय सुरक्षा देणार आहात? यासंदर्भात विद्यापीठाने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असेही या निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याexamपरीक्षाsindhudurgसिंधुदुर्ग