शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: सावंतवाडीत मोक्याच्या ठिकाणी मद्यपान; दुचाकीतून खुलेआम दारू विक्री सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 12:21 IST

एखाद्या व्यक्तीला गोव्यात जायचे झाले तर त्याला  ई पास लागतो पण अवैध दारू व्यावसायिकांना ना ई पास, ना कोण अडवत त्यामुळे ही दारू सिंधुदुर्गात येत आहे.

सावंतवाडी :  सावंतवाडी शहरातील मोक्याची ठिकाणे सध्या तळीरामांचे अड्ड बनत असून, लॉकडाऊन असतानाही गोव्यातून येणारी अवैध दारू आणि खुलेआम होणारी अवैध दारूविक्री यामुळे तळीरामांची चांदीच झाली आहे. या सगळ्याकडे पोलीस हेतू पुरस्कर दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. शहरातील महत्त्वाच्या नाक्यावर काही युवक दुचाकीमध्ये दारूच्या बाटल्या ठेऊन थेट विक्री करतात. नेहमीच्या ग्राहकांना या विक्रेत्यांची माहिती असल्याने ते त्यांच्याकडूनच दारू खरेदी करत असतात. ही सर्व दारू गोव्यातून सिंधुदुर्गमध्ये येत असते. महत्वाचे म्हणजे एखाद्या व्यक्तीला गोव्यात जायचे झाले तर त्याला  ई पास लागतो पण अवैध दारू व्यावसायिकांना ना ई पास, ना कोण अडवत त्यामुळे ही दारू सिंधुदुर्गात येत आहे.सावंतवाडीत तर खुलेआम दारू विक्री होत असतेच. पण आता मोक्याची ठिकाणेही तळीरामांचे अड्डे झाले आहेत. पोलिसांनी शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावले खरे पण या कॅमेºयांचा उपयोग शोभेचे बाहुले कसे झाले आहे. तळीरामांच्या मोक्याच्या ठिकाणावर चार ते पाच युवकांचा समुह एकत्र येत मद्यपान करत असतो. मात्र याकडे पोलिसांचाही दुर्लक्ष होत आहे. सावंतवाडी शहरातील शासकीय धान्य गोडावूनच्या मागे तसेच त्याच्या समोर रात्रीच्या वेळी काही मद्यपी मद्यपान करून तेथेच दारूच्या बाटल्या टाकतात. सध्या नरेंद्र डोंगरावर मद्यपान करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पण शहरातील मोक्याच्या ठिकाणी मद्यपींची गर्दी वाढू लागली आहे. हीच शहरातील नागरिकांची डोकेदुखी होत आहे.पोलिसांना याबाबत माहिती देऊनही पोलीस कारवाई करत नाही, असेच नागरिक सांगत आहेत. दोन दिवसापूर्वी तर येथील गोडावूनच्या जवळ मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या सापडल्या. या दारूच्या बाटल्या तेथे आल्या कशा, हे पोलिसांच्या सीसीटिव्ही मध्ये दिसत असूनही पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. या प्रकारात आता थेट पोलीस अधीक्षकांनी तरी लक्ष घालावा जेणे करून मद्यपींना एक जरब बसू शकेल, असे नागरिकांना वाटत आहे.अत्यावश्यक सेवेच्या पासचा गैरवापरसावंतवाडीत सुरूवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात दुचाकींना वेगवेगळ्या कारणासाठी अत्यावश्यक सेवेचा पास देण्यात आला खरा पण या पासचा काहींनी गैरवापर करत अवैध दारूची मोठ्या प्रमाणात वाहातूक केल्याचे दिसून आले. अजूनही काही जण याच अत्यावश्यक पासचा गैरवापर करत आहेत. मात्र पोलीस याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस