शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोरोनामुक्त गाव स्पर्धा सरपंचांना आमिष दाखविण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 15:30 IST

CoronaVirus Sindhudurg : राज्य शासनाने कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषित करून सरपंचांना ५० लाखाचे बक्षीस ठेवले आहे. मात्र या निर्णयावर मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी टीका केली आहे. हा सरपंचांना आमिष दाखवण्याचा प्रकार असून अशी स्पर्धा घेण्यासाठी शासनाकडे पैसे असतील तर कोविड काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सरपंच, उपसरपंच आणि सनियंत्रण समितीच्या सदस्यांना शासनाने प्रत्येकी ५० लाखांचे विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी पाताडे यांनी केली आहे.

ठळक मुद्देकोरोनामुक्त गाव स्पर्धा सरपंचांना आमिष दाखविण्याचा प्रकारसरपंच, उपसरपंच, सदस्यांना ५० लाखाचे विमा कवच द्या! : सभापती अजिंक्य पाताडे

मालवण : राज्य शासनाने कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषित करून सरपंचांना ५० लाखाचे बक्षीस ठेवले आहे. मात्र या निर्णयावर मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी टीका केली आहे. हा सरपंचांना आमिष दाखवण्याचा प्रकार असून अशी स्पर्धा घेण्यासाठी शासनाकडे पैसे असतील तर कोविड काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सरपंच, उपसरपंच आणि सनियंत्रण समितीच्या सदस्यांना शासनाने प्रत्येकी ५० लाखांचे विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी पाताडे यांनी केली आहे.एकीकडे राज्य शासन ग्रामपंचायतला कोविडसाठी एक रुपयाचा निधी देत नाही आणि गावातील संपूर्ण जबाबदारी सरपंचावर सोपवली आहे. जिल्हापरिषदची संपूर्ण यंत्रणा वापरून जिल्हाधिकारी, प्रशासन आपली पाठ थोपटून घेण्याचे काम करत आहे. ग्रामस्तरीय कोविड सेंटरमध्ये दुर्दैवाने अघटीत घडल्यास सरपंचांना जबाबदार न धरता शासनाने संपूर्ण जबाबदारी घ्यावी. तसेच रात्रपाळीसाठी होमगार्डची तात्काळ नियुक्ती देण्यात यावी.

गावच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्राम नियंत्रण समितीची बाजू मांडताना त्यांना विमा संरक्षण मिळावे. कोविड सेंटरसाठी निधी व कर्मचारी नियुक्ती यासाठी शासनाने तरतूद करावी, अशी मागणी सभापती पाताडे यांनी केली. शासनाला स्पर्धाच ठेवायची असेल तर मग कोरोनामुक्त जिल्हा स्पर्धा लाऊन पालकमंत्र्यांसाठी बक्षीस ठेवा, असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsarpanchसरपंचsindhudurgसिंधुदुर्ग