शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : मच्छी विक्रेते, भाजी विक्रेते यांची ऑन दि स्पॉट आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 13:56 IST

कोरोनामुक्त राहिलेल्या मालवण शहरात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्या पार्श्वभूमिवर पालिकेने खबरदारीच्या उपाययोजना तत्काळ हाती घेतल्या आहेत. औषध फवारणी करून संपूर्ण शहर निजंर्तुकीकरण केले जात आहे. मच्छिविक्रेते व भाजी विक्रेते यांची ऑन दि स्पॉट आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देमच्छी विक्रेते, भाजी विक्रेते यांची ऑन दि स्पॉट आरोग्य तपासणीबैठकीत निर्णय : संपूर्ण मालवण शहर निर्जंतूक करणार

मालवण : कोरोनामुक्त राहिलेल्या मालवण शहरात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्या पार्श्वभूमिवर पालिकेने खबरदारीच्या उपाययोजना तत्काळ हाती घेतल्या आहेत. औषध फवारणी करून संपूर्ण शहर निजंर्तुकीकरण केले जात आहे. मच्छिविक्रेते व भाजी विक्रेते यांची ऑन दि स्पॉट आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मालवण शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमिवर शहर कोविड नियंत्रण समितीची तातडीची बैठक नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात पार पडली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, आरोग्य सभापती पूजा सरकारे, बांधकाम सभापती यतीन खोत, गटनेते गणेश कुशे, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक नितीन वाळके, मंदार केणी, दीपक पाटकर, जगदीश गावकर, पंकज सादये, तृप्ती मयेकर, शीला गिरकर, सुनिता जाधव, आकांक्षा शिरपुटे यासह सदस्य अमित खोत, उमेश मांजरेकर व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.कोरोना रुग्ण मिळत असलेले ठिकाण व परिसर निजंर्तुकीकरण करण्यात आला आहे. डॉक्टरसह अन्य कर्मचारी कोरोनाबाधित झालेले शहरातील खासगी रुग्णालय सोमवारपर्यंत सील करण्यात आले आहे. रुग्ण राहत असलेल्या अन्य इमारतीचा किती परिसर कंटेन्मेंट करायचा याबाबत प्रांताधिकारी निर्णय घेणार आहेत. मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.अन्यथा कारवाई करण्याचा इशारागेले चार महिने मालवण शहर कोरोनामुक्त राहिले. यात सर्वांचेच श्रेय आहे. मात्र, आता रुग्ण संख्या वाढत असल्याने अधिक काळजी घेण्याची आवश्यकता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या वाढणार नाही. यासाठी खबरदारी नियमांचे पालन प्रत्येकाने करावे. शहरात विनाकारण फिरणारे व सोशल डिस्टन्स नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर प्रशासनामार्फत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.बाजारपेठ सुरू राहणारबाजारपेठ आहे त्या वेळेत सुरू राहणार आहे. तरी व्यापारी वर्गाने अधिक खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खरेदीसाठी झुंबड उडणार नाही याची काळजी घ्यावी. भाजी, फळे विक्रेते यांनीही सामायिक अंतर ठेवून गर्दी होणार नाही याची खबरदारी घेऊन व्यवसाय करावा, असे आवाहन नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारMalvan beachमालवण समुद्र किनाराsindhudurgसिंधुदुर्ग