शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Unlock : कणकवलीत जनता कर्फ्यूला उस्फुर्त प्रतिसाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 13:37 IST

दिवसेंदिवस कणकवली शहरात वाढणाऱ्या कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी रविवार पासून आठ दिवसांसाठी जनता कर्फ्यू पाळण्याचे व्यापारी तसेच जनतेने निश्चित केले होते. त्याला सकाळपासूनच उस्फूर्त प्रतिसाद मिळाला . बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळला .त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट होता.

ठळक मुद्देकणकवलीत जनता कर्फ्यूला उस्फुर्त प्रतिसाद!बाजारपेठेत शुकशुकाट ; कोरोनाची पार्श्वभूमी

सुधीर राणेकणकवली : दिवसेंदिवस कणकवली शहरात वाढणाऱ्या कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी रविवार पासून आठ दिवसांसाठी जनता कर्फ्यू पाळण्याचे व्यापारी तसेच जनतेने निश्चित केले होते. त्याला सकाळपासूनच उस्फूर्त प्रतिसाद मिळाला . बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळला .त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट होता.केवळ महामार्ग चौपदरीकरण काम करणारे कामगार त्यांच्या कामाच्या ठिकाणी दिसून येत होते . सकाळच्या सत्रात दूध व वृत्तपत्र विक्री सुमारे दोन तास चालू होती . मात्र त्यानंतर सर्वत्र शुकशुकाट होता . रस्त्यांवर ठिकठिकाणी असणारा पोलीस बंदोबस्तही कुठेही दिसत नव्हता . मात्र, तरीही या जनता कर्फ्यूमध्ये लोक उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याचे दिसत होते .

प्रवासी उपलब्ध नसल्याने एसटी वाहतुकीवर परिणाम झालेला असला तरीही वाहतूक मात्र बंद नव्हती . रिक्षा संघटना ही बंद मध्ये सहभागी झाल्याने बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना अडचणी येत होत्या . शहरातील एकही चहाची टपरी सुरू नसल्याने हॉटेलवर अवलंबून असणाऱ्याना चहा , नाश्ता , जेवणाच्या समस्या निर्माण झाल्या होत्या.शहरातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने नागरिक , व्यापारी व स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्यातून हा निर्णय घेण्यात आला असून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले होते. या आवाहनाला रविवारी उस्फूर्त प्रतिसाद मिळाला . नागरिकांनी घरीच रहाणे पसंत केले.दरम्यान, सोमवारी शासकीय कार्यालये उघडणार असल्याने त्यादिवशीही नागरिक रविवार सारखाच जनता कर्फ्यू पाळतात का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकsindhudurgसिंधुदुर्ग