शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

corona virus : रुग्णसंख्या वाढीचा वेग सुसाट, आॅगस्ट महिन्यात तिपटीने रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 12:42 IST

सुरुवातीला कासवगतीने होणारी कोरोना रुग्णांची वाढ आता सुसाट वेगाने होऊ लागली आहे. मार्च ते जुलै या पाच महिन्यांच्या कालावधीत रुग्णसंख्या काहीशी आटोक्यात होती. मात्र, आॅगस्टनंतर त्याचा विस्फोट झाला आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली.

ठळक मुद्दे रुग्णसंख्या वाढीचा वेग सुसाट, आॅगस्ट महिन्यात तिपटीने रुग्ण मृतांचा आकडाही चौपट वाढला, भीतिदायक वातावरण

गिरीश परब सिंधुदुर्ग : सुरुवातीला कासवगतीने होणारी कोरोना रुग्णांची वाढ आता सुसाट वेगाने होऊ लागली आहे. मार्च ते जुलै या पाच महिन्यांच्या कालावधीत रुग्णसंख्या काहीशी आटोक्यात होती. मात्र, आॅगस्टनंतर त्याचा विस्फोट झाला आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली.

त्यातच जिल्हा रुग्णालयातील बहुतांशी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, तंत्रज्ञ कोरोनाबाधित सापडल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे आहे. खासगी डॉक्टरांनी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. एकंदरीत कोरोनाची परिस्थिती आता हाताबाहेर चालली आहे.जिल्ह्यात रुग्णसंख्या सुसाट वेगाने वाढत आहे. त्यातच जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्याने अन्य वैद्यकीय अधिकारी यांच्यावर सेवेचा अतिरिक्त ताण पडत आहे. रुग्णांकडून कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येत नाहीत. याचाच अर्थ जिल्हा रुग्णालयात चांगली सेवा दिली जात आहे.

२६ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. कणकवली तालुक्यातील हा रुग्ण ९ एप्रिल रोजी बरा झाला. हा रुग्ण मुंबईहून आला होता. रुग्ण सापडताच सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. कडक लॉकडाऊन जरी करण्यात आले. नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली. त्यानंतर दुसरा रुग्ण आढळला. तोही मुंबईहून आला होता. तोही रुग्ण बरा झाला.ज्यावेळी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होता तेव्हा रुग्णसंख्या कमी प्रमाणात होती. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जास्त होते. राज्यात हे प्रमाण ८८ टक्के होते. त्यामुळे राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दुसरा क्रमांक होता. मात्र, आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाले.पहिला रुग्ण ९ एप्रिल रोजी बरा होऊन घरी परतला. ११ जून रोजी ५०वा रुग्ण घरी परतला. १७ जून रोजी १०० वा रुग्ण घरी परला. ९ जुलै रोजी हा आकडा २०० वर गेला. ६ आॅगस्ट रोजी ३०० वा रुग्ण घरी परतला. १६ आॅगस्ट रोजी ४०० वा रुग्ण घरी परतला. २३ आॅगस्ट रोजी ५०० वा रुग्ण घरी परतला. २८ आॅगस्ट रोजी ६०० वा तर १ सप्टेंबर रोजी ७०० रुग्ण घरी परतला. ३ सप्टेंबर रोजी बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या ८०० झाली. ७ सप्टेंबर रोजी ९०० वा रुग्ण घरी परतला तर ९ सप्टेंबर रोजी १000वा रुग्ण घरी परतला. आता सक्रिय रुग्णसंख्या १00६ एवढी आहे.असे आढळले रुग्ण, संख्या पोहोचली २०८६जिल्ह्यात २५ वा रुग्ण २९ मे रोजी आढळला. ५० वा रुग्ण ३० मे रोजी आढळला. १०० वा रुग्ण ५ जून रोजी आढळला. २००वा रुग्ण २८ जून रोजी तर २४ जुलै रोजी ३०० वा रुग्ण आढळला. ३ आॅगस्ट रोजी ४०० वा रुग्ण आढळला. १० आॅगस्ट रोजी ५०० वा रुग्ण आढळला. १६ आॅगस्ट रोजी ६००वा रुग्ण आढळला.२० आॅगस्ट रोजी ७०० वा रुग्ण, २१ रोजी ८०० वा रुग्ण, २२ रोजी ९०० वा रुग्ण, २५ रोजी १००० वा रुग्ण, २९ रोजी ११०० वा रुग्ण, ३० रोजी १२०० वा रुग्ण आढळला. ४१ सप्टेंबर रोजी १३०० वा, २ रोजी १४०० वा, ४ रोजी १६०० वा, ५ सप्टेंबर रोजी १७०० वा रुग्ण आढळला. ४६ सप्टेंबर रोजी १८०० वा रुग्ण आढळला तर ८ सप्टेंबर रोजी १९०० वा रुग्ण आढळला. ९ सप्टेंबर रोजी रुग्णसंख्येने २००० चा टप्पा पार करून ती २०८६ झाली आहे.अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही लागणआॅगस्ट महिन्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात झाली. गणेश चतुर्थीदिवशी तब्बल १३४ रुग्ण आढळून आले. त्यानंतर आतापर्यंत सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आता तर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाने आपल्या जाळ्यात ओढले आहे. त्यामुळे आता वाढत जाणाºया सक्रिय रुग्णसंख्येला सेवा पुरविताना अडचणी येत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग