सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील नागरिकांनी कोविडच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे केले. माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे कोविड लसीकरण व आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहिमेचे बुधवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर उद्घाटन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा समिधा नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी रियास बाबू आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कोरोनाची दुसरी लाट राज्यात आली आहे असे तज्ज्ञ सांगतात असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या की, नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतराचे पालन करणे गरजेचे आहे.कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे खबरदारी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शाहीर कल्पना माळी यांनी कोरोना, लसीकरण व आत्मनिर्भर भारत याविषयावरील कार्यक्रम सादर केला. माहिती व प्रसारण मंत्रालय, प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे यांच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांचे सहकार्य लाभले आहे.यामध्ये चित्ररथ व लोक कलाकारांच्या माध्यमातून लोकांमध्ये कोविड-१९ लसीकरणाबाबतची माहिती, कोविडविषयक नियम, लसीकरणाविषयी लोकांमध्ये असलेले गैरसमज व अफवांबाबत जागृती करणे आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.१० दिवस जनजागृतीजिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये १० दिवस या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी श्रीफळ वाढविले तर अध्यक्षा समिधा नाईक यांनी फित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
corona virus : आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहिमेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 17:01 IST
corona virus Sindhdurgnews- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी कोविडच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे केले. माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे कोविड लसीकरण व आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहिमेचे बुधवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर उद्घाटन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
corona virus : आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहिमेचे उद्घाटन
ठळक मुद्दे आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहिमेचे उद्घाटन नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन करावे : के. मंजुलक्ष्मी