शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : सिंधुदुर्गात प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती राबवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 13:14 IST

देशात आणि राज्याच्या इतर भागात प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती अमलात आणली जात आहे.त्यामुळे या परिणामकारक उपचार पद्धतीचा वापर सिंधुदुर्ग जिल्ह्यात करा. अशी मागणी एका पत्राद्वारे भाजपा आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती राबवा !नितेश राणे यांची मागणी ; जिल्हा प्रशासनाला लिहिले पत्र

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता प्लाझ्मा थेरपीद्वारे रुग्णांवर उपचार करण्यात यावेत. जे कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा जमा करा.

देशात आणि राज्याच्या इतर भागात प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती अमलात आणली जात आहे.त्यामुळे या परिणामकारक उपचार पद्धतीचा वापर सिंधुदुर्ग जिल्ह्यात करा. अशी मागणी एका पत्राद्वारे भाजपा आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जनतेचा अँटीजन रॅपिड टेस्टवर विश्वास नाही. त्यामुळे जास्तीजास्त आरटीपीसीआर टेस्ट करण्यात याव्यात. सद्याच्या कोरोना महामारीच्या आजाराने निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर शासनाकडून विविध उपाय योजनांद्वारे आजार आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे .

त्या अनुषंगाने मी २९ जून २०२० रोजीच्या पत्राद्वारे प्लाझ्मा थेरपीद्वारे कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची सूचना जिल्हा शल्य चिकित्सक , सिंधुदुर्ग यांना केली होती . त्यावर अद्याप काही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही .

सद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के आहे . त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा जमा करून त्याद्वारे कोरोना झालेल्या रुग्णांवर उपचार झाल्यास आजार आटोक्यात येऊ शकतो. त्यामुळे याबाबत गंभीरपणे त्वरीत निर्णय घ्यावा .त्याचप्रमाणे सद्या कोरोना संशयित असलेल्या रुग्णांची अँटीजन रॅपिड तपासणी करण्यात येते. परंतु ती पद्धती सदोष असल्याचे तज्ञांचे म्हणणे असून या म्हणण्यास पूरक अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे कोरोना संशयित रूग्णांची जास्तीत जास्त आर्टिपीसीआर तपासणी करण्यात यावी , अशी मागणी जनतेकडून होत आहे . त्यावर लोकांचा जास्त विश्वास आहे .

दोन्ही विषयांबाबबत आपले स्तरावरून त्वरीत कार्यवाही व्हावी असे पत्राद्वारे आमदार नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना कळविले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर