शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

corona virus : कठोर भूमिका घ्यायला लावू नका, खबरदारी घ्या, नियम पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 15:08 IST

ज्यांच्याकडे तपासणी अहवाल नसेल त्यांना भाजी विक्रीस परवानगी मिळणार नाही. पालिकेला कठोर भूमिका घ्यायला लावू नका, अशी भूमिका नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी स्पष्ट केली आहे.

ठळक मुद्दे कठोर भूमिका घ्यायला लावू नकाखबरदारी घ्या, नियम पाळा : महेश कांदळगावकर यांचे आवाहन

मालवण : कुडाळ येथील कोरोना बाधित भाजी विक्रेत्याच्या संपर्कात मालवणातील जे भाजी विक्रेते आले असतील त्यांनी माहिती लपवू नये. स्वत:ची आरोग्य तपासणी करून घ्यावी. ज्यांच्याकडे तपासणी अहवाल नसेल त्यांना भाजी विक्रीस परवानगी मिळणार नाही. पालिकेला कठोर भूमिका घ्यायला लावू नका, अशी भूमिका नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी स्पष्ट केली आहे.दरम्यान, शहरातील स्थानिक भाजी विक्रेते व मत्स्य विक्रेते या सर्वांची आरोग्य तपासणी पालिकेच्यावतीने लवकरच केली जाणार असल्याचे नगराध्यक्षांनी यावेळी सांगितले.ते म्हणाले, मालवण शहरवासीयांसाठी खरा कसोटीचा काळ सुरू झाला आहे. आजपर्यंत आपले शहर सुरक्षित ठेवण्यास नागरिकांनी प्रशासनाला जसे सहकार्य केले तसेच सहकार्य यापुढेही नागरिक देतील यात शंका नाही. मात्र, नागरिकांना काही सूचना करायच्या असतील तर त्या त्यांनी कराव्यात.

लवकरच गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शहरातील उपाययोजनांबाबत बैठक घेऊन निर्णय घ्यायचे असल्याने नागरिकांच्या सूचनाही विचारात घेतल्या जातील. मालवण व्यापारी संघानेसुद्धा सर्व व्यापारीवर्गाच्या आरोग्य तपासणीसाठी पुढाकार घ्यावा. मुंबई, पुणे अथवा अन्य जिल्ह्यातून मालवणात प्रवासी घेऊन येणाऱ्या खासगी बस मालकांनीही अधिक काळजी घ्यावी.येणाऱ्या प्रवाशांची व प्रवासाची पूर्ण माहिती घेऊन त्याची प्रत मालवण ग्रामीण रुग्णालय व पंचायत समिती येथे द्यावी. शहरातील व्यक्तींची नोंद नगरपालिका तर ग्रामीण भागातील व्यक्तींची नोंद ग्रामपंचायत स्तरावर करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घ्यावी. तसेच सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा गुन्हे दाखल होतील, असेही ते म्हणाले....अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार

शहरात बाहेरून आलेल्या व्यक्तींची नोंद व तपासणी करून त्यांना १४ दिवस क्वारंटाईन ठेवले जात आहे. क्वारंटाईन नियमांचे काटेकोर पालन केलेच पाहिजे. अन्यथा त्या व्यक्तींवर गुन्हे दाखल केले जातील. दोन दिवसांपूर्वी तसा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घ्यावी व सर्व शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.महेश कांदळगावकर, नगराध्यक्ष , मालवण .

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनाराMuncipal Corporationनगर पालिका