शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : मालवण पालिकेच्यावतीने कोरोना स्वॅब तपासणी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 14:39 IST

कोरोनाची वाढती साखळी तोडून मालवण शहर पुन्हा एकदा कोरोनामुक्त करूया, असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.

ठळक मुद्दे नगराध्यक्षांचा कोरोनामुक्त मालवणचा निर्धार आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याचे महेश कांदळगावकर यांचे आवाहन

मालवण : शहरात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. पोलीस, आरोग्य कर्मचारी, व्यापारी यांसह घराबाहेर न पडणाऱ्या महिलाही कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने अधिक सतर्क राहून रुग्णांच्या थेट संपर्कातील सर्वच व्यक्तींची स्वॅब तपासणी करावी. कोरोनाची वाढती साखळी तोडून मालवण शहर पुन्हा एकदा कोरोनामुक्त करूया, असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.दरम्यान, कोरोना रुग्णाला तत्काळ उपचार मिळाले पाहिजेत. कोणत्याही आरोग्य सुविधांची उणीव निर्माण झाल्यास त्या शासन स्तरावरून अथवा पालिका स्तरावरून तत्काळ उपलब्ध करून दिल्या जातील, असेही नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी स्पष्ट केले.मालवण शहरातील कोरोना स्थिती जाणून घेत आरोग्य व्यवस्थेचा आढावा नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी घेतला. यावेळी मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, बांधकाम सभापती यतीन खोत, पालिका अभियंता सोनाली हळदणकर उपस्थित होते.

शहरातील ज्या भागात रुग्ण सापडले आहेत त्या परिसरातील सर्व घरातील नागरिकांची आरोग्य तपासणी सोमवार १४ सप्टेंबरपासून करण्याचे आदेश नगराध्यक्षांनी आरोग्य विभागास दिले आहेत. नागरिकांनीही ताप अथवा अन्य कोणतीही लक्षणे असल्यास त्याबाबत माहिती लपवू नये असे आवाहनही त्यांनी केले.मालवण कुंभारमाठ येथील कोविड केअर सेंटर येथे सध्या शहर व ग्रामीण असे २० रुग्ण उपचार घेत आहेत. काही रुग्ण घरी उपचार घेत आहेत. तालुक्यातील १०० पेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्णांना आवश्यकता भासल्यास मालवण ग्रामीण रुग्णालयात ६ आॅक्सिजन सिलिंडर पुरवठा आहे.

अधिक उपचारासाठी ओरोस येथे स्वतंत्र व्यवस्था असून त्याठिकाणी रुग्णांना नेण्यासाठी यंत्रणा तत्पर आहे. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची स्वॅब तपासणीही जलद गतीने होत आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी दिली.स्वतंत्र वातानुकूलित यंत्रणामालवण पालिकेच्या अल्पबचत सभागृहात स्वतंत्र वातानकुलीत यंत्रणा उभारणी करण्यात येत असून या ठिकाणी कोरोना स्वॅब तपासणी केली जाणार आहे. याठिकाणी काम सुरू असलेल्या यंत्रणेचा आढावा घेत डॉक्टर पाटील यांच्या सूचनेनुसार उभारणी करण्याचे आदेश नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी बांधकाम विभागाला दिले. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने काही आवश्यक बदल त्यांनी सुचविले आहेत.नागरिकांनी पुढे यावेशहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी व नोंद सर्व्हे करण्यासाठी आरोग्य व पालिका प्रशासनासोबत स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांनी व सेवाभावी संस्थांनी स्वत:हून पुढाकार घेत पालिकेच्या आपत्कालीन कोरोना योद्धा टीममध्ये सहभागी व्हावे. सर्व सुरक्षा सुविधा पालिकेच्यावतीने दिल्या जातील. तरी इच्छुकांनी स्थानिक नगरसेवक-नगरसेविका व आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMalvan beachमालवण समुद्र किनाराsindhudurgसिंधुदुर्ग