शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
2
Satara Crime: चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
3
टाटा ट्रस्टमधील वाद लवकरच संपणार? मेहली मिस्त्रींसाठी नवी ऑफर, समूहात वर्चस्व वाढणार
4
IND vs AUS: रोहित शर्मा होणार 'षटकारांचा राजा', आफ्रिदीचा विश्वविक्रम मोडण्यापासून 'इतका' दूर!
5
Satara Crime: "...तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही"; विजय वडेट्टीवार यांचे ट्विट
6
'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच आता बघतो...', जरांगे पाटलांचा हल्लाबोल
7
PSI सोबतची 'ती' दुसरी व्यक्ती कोण? डॉक्टरने हातावर लिहिलेल्या 'त्या' नावाची ओळख उघड
8
पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी PSI चा दबाव; विरोध केल्याने महिला डॉक्टरचा सुरु होता छळ, शेवटी...
9
रोहित शर्माला मिडिया फोटोसाठी हाक मारताच गौतम गंभीर म्हणाला, "फोटो काढून घे, सगळ्यांना..."
10
सौदी-पाकिस्तानच्या अणु करारामुळे भारताचा मित्र असणारा मुस्लिम देश संतापला! मनधरणी करायला पाकचे सेना प्रमुख रवाना
11
आशियात नव्या युद्धाची चाहूल; किम जोंगच्या सैनिकांवर दक्षिण कोरियाचा गोळीबार, कारण काय..?
12
ग्लोव्ह्ज कापून काढले, सलाईन लावताना सुई मोडली! तिलक वर्मानं केलाय 'या' जीवघेण्या आजाराचा सामना
13
Carbide Gun : दिवाळीच्या आनंदावर विरजण! ३०० जणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत; 'कार्बाइड गन' आहे तरी काय?
14
'बिग बॉस'मध्ये प्रणित मोरेचा पुन्हा कॉमेडी शो, सदस्यांना खळखळून हसवलं; नेटकरी म्हणतात...
15
आयडियाची कल्पना! सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी लढवली शक्कल; डोकं केलं पिंजऱ्यात बंद
16
Phaltan Crime: महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? आयुष्य संपविण्यापूर्वी ती तिथे कशी पोहोचली? 
17
१ नोव्हेंबरपासून बदलणार नियम! आता बँक खात्यांसाठी तुम्हाला ठेवता येणार एकापेक्षा अधिक 'वारस'दार, जाणून घ्या
18
पाकिस्तानने 'या' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी, १६ नागरिकांच्या मृत्यूनंतर 'उशिराने शहाणपण'
19
दिल्लीत बॉम्बस्फोटाचा कट उधळला; दोन ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक
20
VIRAL VIDEO : वय केवळ आकडाच! ८२ वर्षांच्या आजीने केली भारतातील सगळ्यात उंच बंजी जम्पिंग; पाहून अंगावर येतील शहारे

corona virus -कोरोनाची पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ५६९ फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 17:22 IST

कणकवली : कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नागरिक दूरचा प्रवास टाळत आहेत. ...

ठळक मुद्देकोरोनाची पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ५६९ फेऱ्या रद्दसिंधुदुर्ग विभागाचे ४ लाख ७४ हजार ४०६ रुपयांचे उत्पन्न बुडाले

कणकवली : कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नागरिक दूरचा प्रवास टाळत आहेत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला गाड्यांच्या अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. सिंधुदुर्ग विभागाला विविध आगारातून एस.टी.च्या ५६९ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे सुमारे ४ लाख ७४ हजार ४०६ रुपयांच्या उत्पन्नाला सिंधुदुर्ग विभागाला एकाच दिवशी मुकावे लागले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजले जात आहेत. शासनाने नागरिकांवर विविध निर्बंध घातले असून शक्यतो प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. या विषाणूच्या प्रभावामुळे राज्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांकडूनही शासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला जात आहे.अनेकांनी प्रवास करण्याचे टाळल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी संख्येवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शुक्रवारी एसटीच्या ५६९ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे २० हजार ९६० किलोमीटर एसटी धावलेली नाही. शाळांना सुट्टी दिलेली असल्याने विद्यार्थ्यांअभावी ३९३ शालेय फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या. तशीच काहीशी स्थिती शनिवारीही होती.

यादिवशीही अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या प्रवासी उपलब्ध नसल्याने अर्ध्यावरून मागे येत असल्याचे एसटीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. या सर्व बाबींमुळे एसटीच्या सरासरी उत्पन्नात घट होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत शासनाने विविध निर्बंध कायम ठेवले असून मनाई आदेश काढले आहेत मात्र, लांब पल्ल्याच्या गाड्या गेल्या दोन दिवसांपासून काही प्रमाणात बंद करण्यात आल्या आहेत. पार्श्वभूमीवर एसटीची वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे.अंमलबजावणीशासनाने कार्यालयांमधील उपस्थिती ३१ मार्चपर्यंत २५ टक्के करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे अगदी अत्यावश्यक काम असेल तरच नागरिकांनी शासकीय कार्यालयात यावे. अन्यथा काही दिवसानंतर आपले काम करून घ्यावे. असे आवाहन तहसीदारांनी केले आहे. शासकीय कार्यालयांना सुटीच रहाणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग