सिंधुदुर्ग : जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गेले १५ दिवस फरार असलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण यांना अटक करण्यात अखेर सिंधुदुर्गनगरी पोलिसांना यश आले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याविरोधात सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस ठाण्यात या रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने कामात असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने विनयभंग केला असल्याची तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.त्यानंतर पोलिसांच्या नजरेआड असलेल्या श्रीमंत चव्हाण यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जाच्या सुनावणीत त्यांना ६ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.दरम्यान ६ फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली होती. मात्र निकाल राखून ठेवण्यात आला होता. प्रथमदर्शनी डॉ. चव्हाण हे दोषी असल्याचे आढळून येत असल्याने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे आदेश 8 फेब्रुवारी रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाकडून देण्यात आले.त्यानंतर डॉ .चव्हाण यांनी आपल्याला अटकपूर्व जामिन मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात विनंती अर्ज केला होता. मात्र हा अर्जही न्यायलयाने फेटाळला होता. त्यामुळे डॉ. चव्हाण यांच्या शोधात सिंधुदुर्गनगरी पोलिस होते. बुधवारी डॉ .चव्हाण यांना जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक तुषार पाटिल, उपविभागीय पोलिस अधीक्षक रोहिणी सोळंकी तसेच सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अखेर शिताफिने ताब्यात घेण्यात सिंधुदुर्गनगरी पोलिसांना यश आले आहे. अशी माहिती या प्रकरणाच्या तपासी अमलदार गायत्री पाटिल यांनी दिली. डॉ चव्हाण यांना गुरुवारी जिल्हा न्यायालयात हजर करणार आहेत.डॉ. चव्हाण यांना कडक शिक्षा व्हावीस्वतःकडे असलेल्या अधिकाराचा गैरवापर करून महिला कर्मचाऱ्याला त्रास देणे आपल्या जिल्ह्याची संस्कृती नाही. श्रीमंत चव्हाण यांनी असे कृत्य केल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. जामीन नाकारून न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे . ही चांगली बाब आहे .यापुढे योग्य तपास करून चव्हाण यांना शिक्षा व्हावी .अशी अपेक्षा या प्रकरणात पीडित महिलेच्या बाजूने उभ्या राहिलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते यांनी व्यक्त केली आहे.
श्रीमंत चव्हाण यांना अटक करण्यात पोलिसांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 12:05 IST
Hospital Doctor Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गेले १५ दिवस फरार असलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण यांना अटक करण्यात अखेर सिंधुदुर्गनगरी पोलिसांना यश आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याविरोधात सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस ठाण्यात या रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने कामात असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने विनयभंग केला असल्याची तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
श्रीमंत चव्हाण यांना अटक करण्यात पोलिसांना यश
ठळक मुद्देश्रीमंत चव्हाण यांना अटक करण्यात पोलिसांना यशमहिला कर्मचाऱ्याने विनयभंग केल्याची तक्रार