शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

corona in sindhudurg-सापळा रचुन गोवा बनावटीची बेकायदा दारु व कार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 12:47 IST

बांदा पोलीसांनी सावंतवाडी तालुक्यातील भालावल येथे सापळा रचुन गोवा बनावटीची बेकायदा दारु वाहतुकी विरोधात कारवाई केली. या कारवाईत ३ लाख ७४ हजार ९२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देसापळा रचुन गोवा बनावटीची बेकायदा दारु व कार जप्तदारू तस्करीची साटेलोटे असल्याचा आरोप

बांदा : बांदा पोलीसांनी सावंतवाडी तालुक्यातील भालावल येथे सापळा रचुन गोवा बनावटीची बेकायदा दारु वाहतुकी विरोधात कारवाई केली. या कारवाईत ३ लाख ७४ हजार ९२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

भालावल तिठा येथे गुरुवारी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशांमध्ये टाळेबंदी आदेश जारी असताना गोव्यातून महाराष्ट्रामध्ये मोठ्याप्रमाणात गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची चोरट्या मार्गाने वहातुकीचे प्रमाण वाढलेले आहे. पण बांदा पोलिसानी सलग दोन दिवसांत दोन कारवाया करत परिसरात करडी नजर ठेवल्याचे सिद्द झाले आहे. यामुळे व्यावसायिकचे धाबे दणाणले आहे.

गोव्याहुन सावंतवाडी येथे गोवा बनावटीच्या चोरट्या दारुची मोठ्या प्रमाणात वहातूक होणार असल्याची पक्की खबर बांदा पोलीसांना मिळाल्याने भालावल येथे सापळा रचला होता. भालावल तिठा येथे गुरुवारी पहाटे १:३० वाजण्याच्या सुमारास कार आली असता कारमध्ये गोवा बनावटीचे वेगवेगळ्या प्रकारचे दारूचे खोके सापडून आले.

या कारवाईत १ लाख २४ हजार ९२० रुपयांच्या दारुसह दारु वाहतुकीसाठी वापरलेली २ लाख ५० हजार रुपयांची कार (एमएच ०४ डीडब्ल्यू १९३५) असा एकूण ३ लाख ७४ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बेकायदा दारु वाहतुकी विरोधात रविराज अंबाजी सावंत (२६, रा. तांबुळी, ता. सावंतवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड काँस्टेबल संजय हुंबे, पोलीस काँस्टेबल मनिष शिंदे, महेश भोई, बाळकृष्ण गवस, दादासो पाटील यांच्या पथकाने केली. महाराष्ट्र झ्र गोवा राज्याच्या सीमा सील असताना तसेच सर्वत्र पोलीस बंदोबस्त असतानाही गोव्यातून होणार्‍या दारु वाहतुकी बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बांदा पोलीस बांदा परिसरात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी चोक बंदोबस्तात व्यस्थ असुनही चोरट्या मार्गावर करडी नजर ठेऊन दारूवर कारवाईचा बडगा उचलले आहे. या उलट बांदा सटमठवाडी चेक नाक्यावरुन अवघ्या दोन किलो अंतरावरील इन्सुली राज्य उत्पादन शुल्क खात्याचे आफिस हे फक्त शोभेची बाहुली बनली आहे.

या आफीस मधील कर्मचार्याना कोरोनाचे सुख- दुःख आहे का तेही कळत नाही. फक्त ते आफिसमध्ये मुग गिळुन गप्प बसले आहे. दारू तस्करीची साटेलोटे असल्याचा आरोप काही जाणकार नागरिकांकडून होत आहे.  संशयीताला गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करणार असल्याचे बांदा पोलीसांनी सांगितले.अधीक तपास बांदा पोलीस करत आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याliquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्ग