शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना योद्धा म्हणता, पण प्रश्न सोडवत का नाही?; एसटी कामगार संघटनेचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 17:36 IST

Corona statetransport Sindhudurg : एकीकडे राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून उल्लेख करायचा, परंतु त्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे. असे धोरण महामंडळाने अवलंबिले आहे. त्यामुळे कर्मचारी संतप्त झाले असून त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी एसटी कामगार संघटनेने परिवहनमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती संघटनेचे मुंबई प्रदेश सचिव दिलीप साटम यांनी दिली.

ठळक मुद्देएसटी कामगार संघटनेचा परिवहनमंत्र्यांना प्रश्नदिलीप साटम यांची माहिती

कणकवली : एकीकडे राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून उल्लेख करायचा, परंतु त्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे. असे धोरण महामंडळाने अवलंबिले आहे. त्यामुळे कर्मचारी संतप्त झाले असून त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी एसटी कामगार संघटनेने परिवहनमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती संघटनेचे मुंबई प्रदेश सचिव दिलीप साटम यांनी दिली.याबाबत साटम यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व सरचिटणीस हनुमंत ताटे यांच्यामार्फत परिवहनमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या बिकट परिस्थितीमध्ये राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी सुरुवातीपासूनच जीवावर उदार होऊन काम करीत आहेत. त्यांचा थेट प्रवाशांशी संबंध येत असल्याने सुमारे सात हजार कर्मचारी कोरोनाबाधित झालेले असून, १५० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.एसटी कर्मचाऱ्यांनी परराज्यातील मजूर, विद्यार्थ्यांना आणणे व सोडण्याचे काम केलेले आहे. तर मुंबईच्या बेस्ट वाहतुकीसाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही एसटी कर्मचारी काम करीत आहेत. आता तर आपण आवश्यक प्रसंगी ऑक्सिजन टँकरची वाहतूक राज्य परिवहन महामंडळाचे चालक करतील, असे जाहीर केले आहे.५० लाखांचे विमा कवच मृतांच्या वारसांना द्यावेएसटी महामंडळाच्या वर्धापन दिनी कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्याबाबत काढण्यात आलेल्या परिपत्रकात जाचक अटींचा समावेश असल्याने ५० लाखांचे विमा कवच फक्त ८ ते १० जणांच्या वारसांना मिळाले. इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांपेक्षा एसटी कर्मचाऱ्यांचे कामाचे स्वरूप वेगळे आहे.

त्यामुळे कोरोनाने मृत पावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच मिळण्यासाठी सध्याच्या अटींचा फेरविचार करून सर्वच कोरोना मृतांच्या वारसांना विमा कवचाची रक्कम मिळण्याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. एसटीच्या सेवेत कर्मचारी मृत झाल्यास त्याच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची तरतूद असताना मध्यवर्ती कार्यालयाच्या स्तरावर त्याची अंमलबजावणी केली जात नाही.एसटी कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावेकोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्याबाबत निर्णय होऊनही त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यांना १४ दिवसांची विशेष रजा मिळणे आवश्यक असताना ती दिली जात नाही. तसेच इतर आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येते, त्याचप्रमाणे सर्व एसटी कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, अशा विविध प्रलंबित प्रश्नांचा समावेश आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग