शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

खातरजमा न करता कोरोनाचे चुकीचे वृत्त : सिंधुदुर्गात तीन वृत्तवाहिन्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 07:31 IST

कोरोनाबाबत अफवा वा खोटी माहिती तोंडी, लेखी, समाज माध्यमांचा वापर करून पसरवीत असल्यास तो कायद्याने गुन्हा आहे.

 सिंधुदुर्गनगरी : खातरजमा न करता व माहिती न घेता कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे वृत्त प्रसारित करणाऱ्या तीन सोशल मीडिया न्यूज चॅनलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.कोरोनाबाबत अफवा वा खोटी माहिती तोंडी, लेखी, समाज माध्यमांचा वापर करून पसरवीत असल्यास तो कायद्याने गुन्हा आहे.जिल्ह्यातील तीन न्यूज चॅनल्सनी कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात असल्याबाबत खोटी माहिती प्रसारित केली ही बाब अत्यंत गंभीर असल्याने तसेच कोरोनाबाबत अफवा व चुकीच्या वृत्तांना आळा घालण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी संबंधीत तीन न्यूज चॅनल्सवर कारवाईचे आदेश दिले.आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २00५ चे कलम ५४, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ च्या अनुषंगाने शासनाने जाहीर केलेली अधिसूचना व भारतीय दंड विधान संहिता कायदा १८६0 च्या कलम १८८ व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार या न्यूज चॅनेल्सवर गुन्हे दाखल करणे सुरू आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMediaमाध्यमे