शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘सहकार’ने शिवसेनेला बेसावध ठेवून फसविले

By admin | Updated: June 18, 2015 00:44 IST

बाळा कदम : चिपळूण अर्बन निवडणुकीनंतरचे कवित्व कायम

चिपळूण : अर्बन बँकेच्या निवडणुकीत शिवसेना - भाजप स्वतंत्र पॅनेल उभे करणार होती. आमची तशी तयारी होती. परंतु, सहकार पॅनेलतर्फे शिवसेनेला निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमंत्रण देण्यात आले. बँकेचा निवडणुकीचा ३० लाख रुपये खर्च टळावा व सहकारात राजकारण नको, यासाठी आम्ही त्यांना होकार दिला. परंतु, अखेरच्या क्षणी आम्हाला बेसावध ठेवून त्यांनी आमची फसवणूक केली, असा आरोप विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी केला. शिवसेनेतर्फे आज (बुधवारी) सकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेवर होत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत. बँकेच्या बाबतीत आम्ही कोणताही आततायीपणा केलेला नाही. शेवटपर्यंत आम्ही पॅनलमध्ये जाण्यासाठी वाट पाहिली. पण, आमच्याच काही सहकाऱ्यांनी गद्दारी केली. त्यामुळे सहकार पॅनेलने आमच्यातील बेदिलीचा फायदा उचलला. त्यांचा डाव आम्ही ओळखू शकलो नाही. तरीही शेवटच्या आठ दिवसात आमचे एकमेव उमेदवार समीर टाकळे यांना १७६० मते मिळाली आहेत. हा आमचा नैतिक विजय आहे. त्यामुळे मतदारांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच, असेही कदम यांनी यावेळी सांगितले.यावेळी नगर पालिकेतील गटनेते नगरसेवक राजू कदम, नगरसेवक शशिकांत मोदी, विभागप्रमुख समीर टाकळे, उमेश सकपाळ, मनोज शिंदे, भय्या कदम, तालुका युवा अधिकारी संदेश आयरे, राकेश देवळेकर, यतीन कानडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वास सुर्वे, शालिग्राम विखारे आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेमुळे बँकेला भुर्दंड सोसावा लागू नये व निवडणूक टळावी, यासाठी आम्ही आमचे दोन उमेदवार द्यायला तयार झालो. आमच्याकडे सुचित्रा खरे, समीर टाकळे, संदीप साडविलकर यांची नावे आली होती. यापैकी दोघांना संधी देण्याचे नक्की झाले. सुरेखा खेराडे यांनी स्वतंत्र अर्ज दाखल केला होता. पॅनेलमध्ये गेल्यास आपण पक्षाकडून निवडणूक लढणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु, अखेरच्या क्षणी खरे व विखारे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यावेळी सहकार पॅनेलने एकही अर्ज मागे घेतला नाही. खेराडे यांच्याशी त्यांची चर्चा होती, तर त्यांनी खेराडे यांना संधी द्यायला हवी होती. परंतु, तसे झाले नाही. आम्हाला समीर टाकळेंच्या माध्यमातून संधी देणे अपेक्षित होते. पण, तिही दिली गेली नाही. त्यामुळे शिवसेनेची व खेराडे यांचीही सहकार पॅनेलच्या नेत्यांनी फसवणूक केली आहे. आता ते नाहक कंगावा करीत आहेत. त्यांनी देवासमोर उभे राहून खरे काय ते सांगावे, असे कदम यांनी स्पष्ट केले. पक्षातील ज्या गद्दारांमुळे या निवडणुकीत गोंधळ झाला, त्या सर्वांची माहिती आमच्याकडे आहे. ही कीड नगर परिषद निवडणुकीपूर्वी ठेचावी लागेल, अन्यथा नगर परिषद निवडणुकीतही आम्हाला ती अडचणीची ठरेल. त्यामुळे या सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी वरिष्ठांकडे करणार आहोत, असेही कदम यांनी सांगितले. माजी आमदार बापूसाहेब खेडेकर हे सहकार पॅनेलचे प्रमुख होते. पण, त्यांनीही आमची बाजू मांडली नाही, अशी खंत यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)गद्दारी मूळावर येईल...अर्बन बँक निवडणुकीत दोन जागा मिळाल्या काय किंवा नाही मिळाल्या काय हा प्रश्न नाही. पण ज्यांनी गद्दारी केली ती किड नगर परिषदेत शिवसेनेच्या मुळावर येईल. त्याची दखल वरिष्ठांनी घ्यावी अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे बाळा कदम यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेसाठी जिल्हाप्रमुख सचिन कदम, आमदार सदानंद चव्हाण, तालुकाप्रमुख सुधीर शिंदे यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले.