शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : प्रदीप वस्त यांची अखेर मत्स्य आयुक्त पदावरून उचलबांगडी, वारुंजीकर सहाय्यक आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 17:06 IST

मालवणातील प्रभारी मत्स्य आयुक्त पदाचा पदभार घेतल्यापासून वादग्रस्त ठरलेल्या प्रदीप वस्त यांची अखेर आमदार वैभव नाईक यांनी मच्छिमारांना दिलेल्या शब्दानुसार पदावरून उचलबांगडी केली.

ठळक मुद्देवादग्रस्त ठरलेल्या प्रदीप वस्त यांची अखेर उचलबांगडी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त म्हणून श्रीकांत वारुंजीकर

मालवण : मालवणातील प्रभारी मत्स्य आयुक्त पदाचा पदभार घेतल्यापासून वादग्रस्त ठरलेल्या प्रदीप वस्त यांची अखेर आमदार वैभव नाईक यांनी मच्छिमारांना दिलेल्या शब्दानुसार पदावरून उचलबांगडी केली.

सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त म्हणून श्रीकांत वारुंजीकर यांनी पदभार स्वीकारावा असे पत्र राज्य मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी वारुंजीकर यांना पाठविल्यानुसार वारुंजीकर यांनी या पदाचा पदभार स्वीकारला.

मत्स्य विभागाचे मत्स्य आयुक्त गोविंद बोडके यांनी वस्त यांच्याकडून पदभार काढून घेत त्यांच्या जागी परवाना अधिकारी असलेल्या श्रीकांत वारुंजीकर यांच्या नियुक्तीचे आदेश देत तत्काळ पदभार घेण्याचे सूचित केले. याबाबत आमदार नाईक यांनी मंत्रालयात आयुक्तांंशी चर्चा करून आदेश काढण्यास भाग पाडले.मत्स्य व्यवसाय कार्यालयात प्रशिक्षण अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या प्रदीप वस्त यांच्याकडे सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. मात्र, वस्त यांच्याकडून समाधानकारक काम केले जात नसल्याचा आरोप मच्छिमारांकडून करण्यात येत होता.

पर्ससीनची अवैधरित्या मासेमारी होत असताना त्यांच्यावर कारवाई होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार नीतेश राणे यांनी छेडलेल्या आंदोलनात त्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले होते. मत्स्य व्यवसाय विभागाकडून सातत्याने अवैधरित्या होणाऱ्या मासेमारी कारवाईची मागणी करूनही वस्त यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मच्छिमारांनी सर्वपक्षीय मेळाव्यात केला होता.

आमदार वैभव नाईक यांनी वस्त यांची महिनाभरात हकालपट्टी करण्यात येईल, असे आश्वासन मच्छिमारांना दिले होते. यासंदर्भात आमदार नाईक यांनी राज्य मत्स्य आयुक्तांचे लक्ष वेधल्यानंतर आज प्रदीप वस्त यांचा कार्यभार काढून घेण्यात आला. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfishermanमच्छीमार