शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही सुदृढतेसाठी योगदान देऊया - के. मंजूलक्ष्मी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 18:02 IST

प्रत्येकाच्या मताची किंमत अमुल्य आहे. मी एकट्याने मतदान केले नाही तर काय फरक पडतो या वृत्तीला मनात थारा न देता येत्या २३ एप्रिल रोजी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही सुदृढतेसाठी योगदान

ठळक मुद्देकुडाळ पंचायत समितीच्यावतीने मतदार जागृतीसाठी भव्य रॅलीचे माणगाव येथे आयोजन करण्यात आले

सिंधुदुर्गनगरी :  प्रत्येकाच्या मताची किंमत अमुल्य आहे. मी एकट्याने मतदान केले नाही तर काय फरक पडतो या वृत्तीला मनात थारा न देता येत्या २३ एप्रिल रोजी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही सुदृढतेसाठी योगदान देण्याचा आज संकल्प करुया असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या सह अध्यक्षा के. मंजुलक्ष्मी यांनी माणगाव (ता. कुडाळ) येथे बोलताना केले.

कुडाळ पंचायत समितीच्यावतीने मतदार जागृतीसाठी भव्य रॅलीचे माणगाव येथे आयोजन करण्यात आले. या रॅलीच्या उद्घाटनपर सोहळ्यात के.मंजुलक्ष्मी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या संमारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे हे होते.  व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश जगताप, अप्पर पोलीस अधिक्षक निमित गोयल, सहाय्यक निवडणूक अधिकारी विकास सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, संतोष जिरगे, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

माणगाव तिठा ते माणगाव बाजारपेठ असे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत साळगाव हायस्कूलचे ढोल पथक, लेझिम पथक, दशावतारी कलाकारांचा चित्ररथ, बचत गटाच्या, आशा सेविका पथक, महिला व पुरुष यांची मोटार सायकल रॅली यांचा समावेश होता. या रॅलीत व उद्घाटन समारंभत माणगाव पंचक्रोशितील नागरिक मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.आपले एक मत ही अत्यंत महत्वाचेजिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी या प्रसंगी बोलताना मिझोराम राज्यातील दुर्गम प्रदेशात केवळ एका व्यक्तीच्या मतदानासाठी मतदान केंद्राचे अधिकारी व कर्मचारी आठ किलोमीटर ट्रेकिंग करत त्या मतदाराचे मतदान घेतात असे उदाहरण देऊन ते म्हणाले प्रत्येक मत अमुल्य आहे. लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.आकर्षक पथनाट्य व दशावतारी नाटीकेस रसिकांची उत्स्फूर्त दादमतदार जागृती उद्घाटन समारंभ प्रसंगी साळगाव हायस्कूलच्या मुला-मलींनी मतदार जागृतीबाबत आकर्षक पथनाट्य सादर केले. तसेच यानंतर आरोग्य सेवेतील कर्मचारी यांनी दशावतार नाटीका सादर केली. या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. 

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गElectionनिवडणूक