शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पुन्हा काम बंद आंदोलन 

By अनंत खं.जाधव | Updated: August 22, 2023 19:05 IST

सावंतवाडी :  येथील पालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी पुन्हा एकदा काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आठवडाभरात पगार ...

सावंतवाडी :  येथील पालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी पुन्हा एकदा काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आठवडाभरात पगार देण्याचे आश्वासन देऊन सुद्धा पगार न मिळाल्याने आपण पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जोपर्यंत पगार दिला जात नाही तोपर्यंत आम्ही कामावर रुजू होणार नाही, असा  इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे पालिका प्रशासन ठेकेदार आणि कामगार यांच्यात वाद रंगण्याची शक्यता या निमित्ताने निर्माण झाला आहे.या नगरपरिषद कत्राटी कर्मचाऱ्यांनी आठवडाभर पूर्वी पालिका कार्यालयासमोर काम बंद आंदोलन केले होते. यावेळी सर्वपक्षीयांकडून मध्यस्थी करण्यात आली होती. त्यानंतर पगार देण्याचे लेखी आश्वासन ठेकेदारांने दिले होते. त्यानुसार तुम्हाला तुमचा पगार मिळवून देऊ, असे आश्वासन यावेळी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दिले होते. परंतु दिलेल्या आश्वासनानुसार या ठेकेदाराने त्यांचे मानधन अदा केलेले नाही तर दुसरीकडे फक्त १५ दिवसाचा पगार देतो असे नव्या ठेकेदाराचे म्हणणे आहे. मात्र चतुर्थी जवळ आल्यामुळे अर्ध्या पगारात करायचे काय  तसेच दोन महिन्याच्या पगार मिळणार कसा असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे त्यांनी आज पुन्हा एकदा काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पालिका प्रशासन व ठेकेदार कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.दोन वर्षापासून पी.एफ ची रक्कम भरलीच नाहीठेकेदाराकडून दोन वर्षापासून कामगारांची पी.एफ ची रक्कम भरली नाही.असे असतना नगरपरिषद अधिकाऱ्यांनी त्यांना कोणतेच बंधन घातले नाही.किंवा विचारणा केली नाही यामुळे ठेकेदारावर कारवाई करतानाच नगरपरिषद मधील दोषींवर कारवाई करा अशी मागणी कामगारांकडून होत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडी