शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळात पावसाची संततधार, सार्वजनिक विहीर कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 10:32 IST

कुडाळ तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. भंगसाळ नदीचा पूर काही प्रमाणात ओसरला असला तरी पुराचा धोका कायम आहे. तर गोवेरी पालकरवाडी येथील सार्वजनिक रोजगार योजनेतील शासकीय विहीर मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देकुडाळात पावसाची संततधार, सार्वजनिक विहीर कोसळलीकाही कुटुंबे झाली स्थलांतरित

कुडाळ : कुडाळ तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. भंगसाळ नदीचा पूर काही प्रमाणात ओसरला असला तरी पुराचा धोका कायम आहे. तर गोवेरी पालकरवाडी येथील सार्वजनिक रोजगार योजनेतील शासकीय विहीर मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना घडली आहे.कुडाळ तालुक्यात गेले तीन-चार दिवस सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. काही नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी भंगसाळ नदीचे पात्र ओसंडून वाहत असल्याने कुडाळ शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, लक्ष्मीवाडी, काळपनाका, भैरववाडी येथील भागात पुराचे पाणी आले होते. तर डॉ. आंबेडकरनगर येथील काही कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले.शनिवारीही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत पावसाने काही प्रमाणात उसंत घेतली. मात्र, संततधार सुरूच होती. नदीचा पूर काही प्रमाणात ओसरला असला तरी पूरस्थिती ह्यजैसे थेह्ण अशीच होती. मुसळधार पाऊस पुन्हा सुरू झाल्यास पुन्हा मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे गोवेरी पालकरवाडी येथे २००५ साली बांधण्यात आलेली सार्वजनिक रोजगार योजनेतील शासकीय विहीर कोसळल्याची घटना घडली. या विहिरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्या वर्षा कुडाळकर, सरपंच, तलाठी, सुषमा गायकवाड तसेच इतर अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांनी जाऊन पाहणी केली. या विहिरीच्या नुकसानीचा पंचनामा संबंधित विभागाच्यावतीने करण्यात येणार आहे. पावसाचा जोर तालुक्यात वाढत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.आपत्ती कक्षात नोंदगेल्यावर्षी मुसळधार पावसात सरंबळ येथील डोंगर खचला होता. त्यामुळे तेथील काही घरांना भीती निर्माण झाली होती. शुक्रवारी मुसळधार पडलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा डोंगर खचण्याची भीती होती. दरम्यान, शुक्रवारी या या डोंगराची पाहणी तहसीलदार अमोल फाटक व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. तसेच तालुक्यात काही घरांचे पत्रे उडण्याच्या, मांगर पडण्याच्या घटनांची नोंद तहसील कार्यालयातील आपत्ती कक्षात करण्यात आली आहे. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग