वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यात कंटेन्मेंट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 05:41 PM2021-04-20T17:41:09+5:302021-04-20T17:43:57+5:30

CoronaVIrus Sindhudug- वेंगुर्ले तालुक्यात 5 ठिकाणी, तर दोडामार्ग तालुक्यात 18 ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. वेंगुर्ले तालुक्यात वजराठ- परबवाडी, खानोली - समतानगर, शिरोडा - हरीजनवाडी, पाल गोडाव - मठ वडखोलवाडी या सर्व ठिकाणी दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत, तर खवणे - पागेरावाडी येथे दि. 1 मे 2021 रोजीपर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आले आहेत, तर दोडामार्ग तालुक्यात  18 ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत.

Containment zone in Vengurla, Dodamarg taluka | वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यात कंटेन्मेंट झोन

वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यात कंटेन्मेंट झोन

Next
ठळक मुद्देवेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यात कंटेन्मेंट झोनदोडामार्ग तालुक्यात 18 ठिकाणी कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्ग : वेंगुर्ले तालुक्यात 5 ठिकाणी, तर दोडामार्ग तालुक्यात 18 ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. वेंगुर्ले तालुक्यात वजराठ- परबवाडी, खानोली - समतानगर, शिरोडा - हरीजनवाडी, पाल गोडाव - मठ वडखोलवाडी या सर्व ठिकाणी दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत, तर खवणे - पागेरावाडी येथे दि. 1 मे 2021 रोजीपर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आले आहेत, तर दोडामार्ग तालुक्यात  18 ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत.

या कंटेन्मेंट झोनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या दिनांकापर्यंत सर्व अस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच नागरिकांच्या येण्या-जाण्यास व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. सदर आदेश अत्यावश्यक सेवा जसे सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था इ. वितरीत करणारे, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या वाहनांना लागू असणार नाहीत. या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 व 58, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 71,139 आणि भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत.

दोडामार्ग तालुक्यातील कंटेन्मेंट झोन

मोरगाव -दळवीवाडी येथे दि. 28 एप्रिल 2021 पर्यंत, मणेरी - गौतमवाडी येथे दि. 29 एप्रिल 2021 पर्यंत, मोरगाव-बडमेवाडी येथे दि. 28 एप्रिल 2021 पर्यंत, घोटगेवाडी - खालचीवाडी येथे दि. 25 एप्रिल 2021 पर्यंत, ‍घोटगे-वायंगणतड येथे दि. 26 एप्रिल 2021 पर्यंत, भिकेकोनाळ येथे दि. 28 एप्रिल 2021 पर्यंत, बांबर्डे येथे दि. 28 एप्रिल 2021 पर्यंत, साटेली भेडशी - थोरले भरड येथे दि. 29 एप्रिल 2021 पर्यंत, मांगेली - देऊळवाडी येथे दि. 29 एप्रिल 2021 पर्यंत, घोडगेवाडी - टेमवाडी येथे दि. 28 एप्रिल 2021 पर्यंत, सासोली - बाजारवाडी येथे दि. 28 एप्रिल 2021 पर्यंत, मोरगाव - गावठणवाडी येथे दि. 29 एप्रिल 2021 पर्यंत, मोरगाव - गौतमवाडी येथे दि. 29 एप्रिल 2021 पर्यंत, घारपी - भरडवाडी येथे दि. 27 एप्रिल 2021 पर्यंत , कोनशी-रायवाडी येथे दि. 29 एप्रिल 2021 पर्यंत, कसई दोडामार्ग - सावंतवाडा येथे दि. 1 मे 2021 पर्यंत, कसई दोडामार्ग -बाजारपेठ येथे दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत, कसई दोडामार्ग - ग्रामिण रुग्णालय कर्मचारी निवास इमारत येथे दि. 27 एप्रिल 2021 रोजीपर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आला आहे.
 

Web Title: Containment zone in Vengurla, Dodamarg taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.