शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी, बांधकामच्या अपर सचिवांनी कामांचा घेतला आढावा

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 13, 2023 13:00 IST

नौदल दिनाची पार्श्वभूमी, २८ला पुतळा दाखल होणार

सिंधुदुर्ग : मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी होत आहे. कामे गतीने सुरू आहेत. गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभाग अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी या ठिकाणी भेट देऊन सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. २८ ऑक्टोबरदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा राजकोट येथे दाखल होणार आहे. त्यानंतर पुतळा उभारणी व उर्वरित कामे १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जातील, अशी माहिती उपस्थितीत अधिकारी यांच्या चर्चेतून प्राप्त झाली आहे.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांसह मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कोकण शरद राजभोज, अधीक्षक अभियंता रत्नागिरी छाया नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, कार्यकारी अभियंता कणकवली सिंधुदुर्ग अजयकुमार सर्वगोड, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूसे, तहसीलदार वर्षा झालटे, पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यासह बांधकाम, महसूल व अन्य विभाग अधिकारी उपस्थित होते.

दोन्ही इमारतींची कामे ३१पर्यंत पूर्ण करणार : सर्वगोडमालवण येथील शासकीय विश्रामगृहाची नव्याने उभारणी तसेच दुसऱ्या इमारतीची दुरुस्ती सुरू आहे. येथील कामांचा आढावा अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या वतीने घेण्यात आला. दोन्ही इमारतींची कामे ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने काम सुरू असल्याचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरही पाहणीअपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत तारकर्ली एमटीडीसी येथेही पाहणी केली. त्यानंतर तारकर्ली एमटीडीसी स्कुबाडायविंग सेंटर येथे आढावा बैठक घेतली. सुरू असलेल्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी गुरुवारी सायंकाळी किल्ले सिंधुदुर्ग या ठिकाणी भेट देत पाहणी केली. येथील मंदिरांची व परिसराची पाहणी करत आढावा घेण्यात आला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज