शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम अभियंत्याला मारहाण, नेरुर येथील तिघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 10:35 IST

कुडाळ नगरपंचायतीमार्फत उभारण्यात येणाऱ्या घनकचरा वीजनिर्मिती प्रकल्प इमारतीचे काम करण्यासाठी गेलेल्या नगरपंचायत बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नेरूर येथील प्रभाकर उर्फ गणेश गावडे, सहास मुळम व सुवर्णा कदम या तिघांविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबांधकाम अभियंत्याला मारहाणनेरुर येथील तिघांवर गुन्हा दाखल

कुडाळ : नगरपंचायतीमार्फत उभारण्यात येणाऱ्या घनकचरा वीजनिर्मिती प्रकल्प इमारतीचे काम करण्यासाठी गेलेल्या नगरपंचायत बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नेरूर येथील प्रभाकर उर्फ गणेश गावडे, सहास मुळम व सुवर्णा कदम या तिघांविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेले अभियंता विशाल सत्यवान होडावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रस्तावित प्रकल्पासाठी कुडाळ येथे भूखंड मंजूर करण्यात आला आहे. मात्र, हा भूखंड नागरी वस्तीपासून जवळ असल्याने याचा आपल्याला त्रास होणार असल्याचे नेरूर ग्रामस्थांचे म्हणणे असून, या प्रकल्पाला अनेक वेळा विरोध केला आहे. तसेच बांधकाम बंद पाडण्याचाही अनेक वेळा प्रयत्न केला आहे.शनिवारी सकाळी प्रकल्पाच्या इमारतीच्या खोदाईसाठी होडावडेकर, त्यांचे सहकारी राजाराम नारायण कुंभार व नगरपंचायतीचे कर्मचारी आणि कामगार गेले होते. यावेळी तेथे तीन व्यक्ती येऊन त्यांनी जेसीबी चालकांना काम बंद करण्यास सांगून मारहाण केली. तसेच नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून चित्रीकरणाचा कॅमेरा काढून घेत काम बंद करण्याची धमकी देत निघून गेले, अशी माहिती दिली.याबाबतची माहिती मुख्याधिकारी देवानंद ढेकळे व नगराध्यक्ष ओंकार तेली यांना दिल्यानंतर होडावडेकर कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले. तसेच नगराध्यक्ष तेली, मुख्याधिकारी ढेकळे तसेच नगरपंचायतीचे सर्व सभापती व नगरसेवकांनी पोलीस ठाणे गाठले.

अभियंता होडावडेकर यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद केले. तसेच होडाववडेकर यांना झालेली मारहारण चुकीची असून, संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.दरम्यान, कुडाळ येथे आमसभेसाठी आलेले आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात येऊन उपस्थित दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच नगराध्यक्ष तेली, नेरूर सरपंच शेखर गावडे यांच्याशी चर्चा केली. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग