शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाणमांजरांचे संवर्धन करणार : संजू परब यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:36 IST

सावंतवाडी येथील मोती तलावात पाणमांजरांचे आगमन हे पर्यावरणीय समृद्धीचे निदर्शक आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये संरक्षित अशा या प्राण्याला संरक्षण द्यावे, अशी मागणी घुंगुरकाठी सिंधुदुर्ग या सेवाभावी स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी केली होती. याला सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पाणमांजरांचे संवर्धन व्हावे यासाठी नगरपालिका प्रयत्न करेल, असे स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देपाणमांजरांचे संवर्धन करणार : संजू परब यांची माहिती घुंगुरकाठी संस्थेने केली होती मागणी, नगराध्यक्षांचा प्रतिसाद

सावंतवाडी : सावंतवाडी येथील मोती तलावात पाणमांजरांचे आगमन हे पर्यावरणीय समृद्धीचे निदर्शक आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये संरक्षित अशा या प्राण्याला संरक्षण द्यावे, अशी मागणी घुंगुरकाठी सिंधुदुर्ग या सेवाभावी स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी केली होती. याला सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पाणमांजरांचे संवर्धन व्हावे यासाठी नगरपालिका प्रयत्न करेल, असे स्पष्ट केले आहे.सावंतवाडीच्या मोती तलावात मोठ्या प्रमाणात पाणमांजरे आढळत असून ही पाणमांजरे तलावातील मासे खातात अशी ओरड अनेकांनी केली होती. त्यामुळे ही पाणमांजरे मोती तलावाबाहेर काढली जावीत, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र घुंगुरकाठी सिंधुदुर्ग या सेवाभावी स्वयंसेवी संस्थेच्यावतीने अध्यक्ष सतीश लळीत यांनी ही पाणमांजरे नष्ट करू नये, अशी मागणी केली होती.

पाणमांजरांचे अस्तित्व हे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठीही उपयुक्त ठरु शकेल, त्यादृष्टीने पाणमांजरांच्या आगमनाकडे पहावे, असे मत सतीश लळीत यांनी मांडले होते.सावंतवाडी आणि परिसरात असलेल्या जैवविविधतेचे जतन करणे काळाची गरज बनली आहे. अन्यथा माणसाला आगामी काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे सावंतवाडी परिसरात आढळणाऱ्या दुर्मिळ प्राणी, पक्षांचे जतन करणे आवश्यक असल्याची भावना लळीत यांनी मांडली होती.स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन संवर्धन करणारपाणमांजरांच्या संवर्धनासाठी सावंतवाडी नगरपालिकेचीही महत्त्वाची भूमिका होती. नगराध्यक्ष संजू परब यांनी ही पाणमांजराचे संवर्धन होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही ही पाणमांजरे नष्ट करणार नसून स्वयंसेवी संस्थेची मदत घेऊन काय करता येईल याचा अभ्यास करू, असे परब यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवsindhudurgसिंधुदुर्ग