शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काँग्रेस ग्रामपंचायत निवडणुक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 17:37 IST

Congress Sindhudurgnews- सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका या काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविणार आहे . गेल्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जात जिल्ह्यात भाजपची ताकद नगण्य असल्याचे दाखवून देवू. तसेच जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस संघर्ष करेल. अशी पक्षाची आगामी काळातील भूमिका काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांनी स्पष्ट केली.

ठळक मुद्देकाँग्रेस ग्रामपंचायत निवडणुक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार! काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांची माहिती

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका या काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविणार आहे . गेल्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जात जिल्ह्यात भाजपची ताकद नगण्य असल्याचे दाखवून देवू. तसेच जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस संघर्ष करेल. अशी पक्षाची आगामी काळातील भूमिका काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांनी स्पष्ट केली.कणकवली येथील काँग्रेस कार्यालयात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इर्शाद शेख , जिल्हा चिटणीस महेंद्र सावंत , सरचिटणीस प्रकाश जैतापकर , कणकवली तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर , तालुका सरचिटणीस प्रवीण वरूणकर , कणकवली शहराध्यक्ष महेश तेली , प्रदीप तळगावकर , प्रदीपकुमार जाधव , महिला तालुकाध्यक्ष डॉ . सूनीता म्हापणकर , विजय कदम , संदीप कदम , दयानंद बांदेकर , बी . के . तांबे आदी उपस्थित होते .राजन भोसले म्हणाले , ग्रामपंचायत निवडणुकांसाठी काँग्रेसचा निरीक्षक म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी माझी नियुक्ती करण्यात आली आहे . काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून बाळा गावडे यांची निवड झाल्यानंतर गावागावात पक्ष वाढीचे काम सुरू झाले आहे . कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या जोरावर काँग्रेसची संघटना बांधणी सुरू करण्यात आली आहे . यापूर्वी काँग्रेसमधले काहीजण काँग्रेस घेऊन पळून गेले. मात्र , आता ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रदेश स्तरावरून कार्यकर्त्यांना मोठी ताकद दिली जाणार आहे.ग्रामपंचायत सोबतच दोडामार्ग व वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीही काँग्रेसने महाविकास आघाडी म्हणून ताकद लावली आहे . दोन वर्षांपूर्वी काँग्रेसला जिल्ह्यात कार्यकर्ते मिळत नव्हते ही वस्तुस्थिती होती . मात्र, आता निश्चितच जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढीस लागला आहे.आता इच्छुक उमेदवारांची ही संख्या वाढत असल्याने सर्वांना विश्वासात घेत उमेदवारी देण्याचे आव्हान आमच्यासमोर असणार आहे . येत्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसने बांधणी सुरू केली असून ग्रामपंचायत किंवा इतर निवडणुकांसाठी काँग्रेसचे संपर्कमंत्री , नेते लक्ष घालणार आहेत .महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम या धर्तीवर जिल्ह्यात समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना विविध समित्यामध्ये समप्रमाणात स्थान मिळणार आहे . नोव्हेंबर महिन्यात समन्वय समितीची बैठक घेण्यात आली होती . त्यात विकास कामे किंवा अन्य नियुक्त्यांमध्ये जो काँग्रेसचा वाटा ठरलेला आहे तेवढा देण्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष पालकमंत्री व खासदार विनायक राऊत यांनीही मान्य केले आहे . जिल्ह्यात होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी काँग्रेसचे संपर्कमंत्री सतेज पाटील जिल्ह्यात येणार आहेत असे भोसले यांनी सांगितले .इर्शाद शेख म्हणाले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत वाळू दरा संदर्भात बैठक घेण्यात आली . तिथे सकारात्मक निर्णय झाला असून हात पाटीने वाळू काढणारे गरीब लोक आहेत . याकडे महसूल मंत्र्याचे लक्ष वेधले . त्यामुळे सक्शन मशीनचा वापर करून वाळू काढणाऱ्यांचा निकष हात पाटीच्या वाळू उपशाला लावू नये असे दस्तुरखुद्द महसूल मंत्र्यांनी सांगितले आहे.

यावेळी वाळूच्या दराची प्रति ब्रासची रॉयल्टी कमी करा अशी मागणी आम्ही महसूल मंत्र्यांकडे केली . याबाबत महसूल मंत्र्यांनी निर्णय घेतला असून संबधित निर्णयाची अंमलबजावणी व पुढील कार्यवाहीसाठी अर्थ विभागाकडे पाठविण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले . 

टॅग्स :congressकाँग्रेसgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकsindhudurgसिंधुदुर्ग