शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: न्यायालयीन कोठडीतील सचिन आग्रे याला सशर्थ जामीन मंजूर, अल्पवयीन मुलीला दिली होती धमकी 

By सुधीर राणे | Updated: July 4, 2024 15:47 IST

कणकवली : अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवत प्रेमसंबंध प्रस्थापित करून नंतर तीची छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या ...

कणकवली: अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवत प्रेमसंबंध प्रस्थापित करून नंतर तीची छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या वैभववाडी तालुक्यातील सचिन सुरेश आग्रे याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश तथा विशेष न्यायाधिश एस. एस. जोशी यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला आहे. सन २०२१ मध्ये महाविद्यालयात जाण्यासाठी आरोपीच्या प्रवासी वाहनातून प्रवास करताना निर्माण झालेल्या ओळखीतून आरोपीने अल्पवयीन मुलीशी जवळीक निर्माण केली. त्यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. तसेच साशेल मिडीयाद्वारे चॅटींगही होऊ लागले. दरम्यानच्या कालावधीत प्रेमसंबंधांचा फायदा घेत त्याने तीच्याशी संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोघांच्या घरच्यांना याबाबत कल्पना येताच मुलीच्या पालकांनी आरोपीकडे रितसर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, जात व वयातील अंतराचे कारण देत नकार देण्यात आला. तरीही दोघांमध्ये बोलणे चालू होते.त्यानंतर आरोपीने त्या मुलीकडे पूर्वीची छायाचित्रे व व्हिडीओची मागणी केली असता त्याला तीने नकार दिला. त्यावरून दोघांत वाद निर्माण झाले. त्यावेळी आरोपीने त्याच्याकडील छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिली. ही बाब मुलीने आपल्या नातेवाईकाला सांगितल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली होती. आरोपी एप्रिल २०२४ पासून न्यायालयीन कोठडीत होता. त्याच्या जामिनावर झालेल्या सुनावणीत ५० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करताना त्या तक्रारदार मुलीच्या गावी जाऊ नये, साक्षीदारांवर दबाव आणू नये आदी अटी घालण्यात आल्या आहेत. आरोपीच्यावतीने एड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीCourtन्यायालय