शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'बीएसएनएल'च्या संदर्भातील तक्रारीचे निरसन एका महिन्यात करणार, प्रधान महाप्रबंधकांचे आश्वासन

By सुधीर राणे | Updated: October 7, 2023 17:56 IST

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएलच्या संदर्भात जेवढ्या तक्रारी आहेत त्यांचे निरसन एका महिन्यात केले जाईल. प्रत्येक महिन्याला त्या कामाचा आढावा ...

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएलच्या संदर्भात जेवढ्या तक्रारी आहेत त्यांचे निरसन एका महिन्यात केले जाईल. प्रत्येक महिन्याला त्या कामाचा आढावा घेतला जाईल असे कोल्हापूर येथील प्रधान महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी आश्वासन दिले. तसेच टॉवरची रेंज का जाते आणि नवीन टॉवर उभारण्यासाठी कोणत्या गोष्टींची कमतरता राहिलेली आहे त्याचाही आढावा घेतला जाणार  असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान कणकवली, देवगड, वैभववाडी या तीन तालुक्यात नव्याने १५७ बीएसएनएलचे टॉवर कोठे-कोठे मंजूर झाले आहेत याची यादी यावेळी जाहीर करण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएलच्या संदर्भात समस्यांचा सरपंच आणि लोकप्रतिनिधी यांनी कोल्हापूर येथील बीएसएनएलचे प्रधान महा प्रबंधक यांच्यासमोर पाढा वाचला. कणकवली येथे भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. दरम्यान आमदार राणे यांनी जनतेच्या तक्रारींचे निरसन कसे करणार, त्याचे वेळापत्रक ठरवा, प्रत्येक टॉवरचे नेटवर्क सुरळीत करा. ही सर्व कामे निर्धारित वेळेमध्ये करा अशा सूचना केल्या. आमदार राणे यांना मतदार संघात गावभेटीदरम्यान बीएसएनएलच्या नेटवर्क संदर्भातील अनेक तक्रारी येतात. याबाबत मुंबई येथे दूरसंचार निगमचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत चर्चा केल्यावर कोल्हापूर येथील महाप्रबंधकांच्या उपस्थितीत कणकवली येथे बैठक घेण्याचे ठरले होते. त्यानुसार मतदारसंघातील सरपंच आणि लोकप्रतिनिधींची विशेष बैठक बोलावण्यात आलेली होती.  या बैठकीला भाजप प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत बीएसएनएलचे सावंतवाडी उपमहाप्रबंधक आर.वी.जाणू, कणकवली येथील ज्युनियर ऑफिसर नेरकर, सब डिव्हिजन इंजिनियर देवगडचे कैलास पायमोडे यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी अनेक समस्या मांडल्या. काही गावांमध्ये टॉवर असून रेंज नाही. टॉवर योग्य जागी नसल्याने सर्वदूर रेंज पसरत नाही. असे अनेक प्रश्न यावेळी मांडले. बीएसएनएलने आपले नेटवर्क वाढवावे. असलेले टॉवर सुरळीत सुरू ठेवावेत. जे टॉवर नवीन निर्मिती करायचे आहेत त्याचे करार चुकीच्या पद्धतीने करून घेतले जात आहे.  प्रत्येक टॉवरची स्थिती रेंज ४जी, ३जी, २जी या संदर्भात चर्चा झाली. सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी मांडलेले मुद्दे नोंद करून घेऊन त्यावर महिन्याभरात काम केले जाईल आणि सेवा सुरळीतपणे दिली जाईल. त्या सेवेचा आढावा सातत्याने घेतला जाईल असे आश्वासन अरविंद पाटील यांनी यावेळी दिले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBSNLबीएसएनएलNitesh Raneनीतेश राणे