शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कणकवली मुख्याधिकारी, नगररचना प्रमुखांविरोधात विभागीय आयुक्तांकडे तक्रार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 13:09 IST

Kankavli, MuncipaltyCarporation, Sindhudurgnews कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी विनोद डवले आणि नगररचना प्रमुख मयूर शिंदे हे दोघे बांधकाम व्यावसायिकांना हाताशी धरून बेकायदा बांधकामांना अभय देत आहेत. शासनाच्या विकास नियंत्रण नियमावलीचे राजरोस उल्लंघन केले जात आहे. त्याबद्दल या दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात विभागीय आयुक्तांकडे तक्रार करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक कन्हैया पारकर यांनी दिली आहे.

ठळक मुद्देकणकवली मुख्याधिकारी, नगररचना प्रमुखांविरोधात विभागीय आयुक्तांकडे तक्रार ! माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक कन्हैया पारकर यांची माहिती

कणकवली : कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी विनोद डवले आणि नगररचना प्रमुख मयूर शिंदे हे दोघे बांधकाम व्यावसायिकांना हाताशी धरून बेकायदा बांधकामांना अभय देत आहेत. शासनाच्या विकास नियंत्रण नियमावलीचे राजरोस उल्लंघन केले जात आहे. त्याबद्दल या दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात विभागीय आयुक्तांकडे तक्रार करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक कन्हैया पारकर यांनी दिली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कणकवली हे जिल्ह्याचे मध्यवर्ती शहर आहे.या शहराची व्यापारी दृष्ट्या चांगलीच प्रगती झाली असून बांधकाम व्यवसाय सुद्धा बहरला आहे.मात्र, त्याचाच गैरफायदा मुख्याधिकारी विनोद डवले आणि नगर रचना प्रमुख मयूर शिंदे या दोघांकडून घेतला जात आहे. काही बांधकाम व्यावसायिकांना हाताशी धरून बेकायदा बांधकामांना अभय दिले जात आहे.

चुकीची भोगवटा प्रमाणपत्रे दिल्याने शासनाच्या विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन होत आहे. अनेक बांधकामांना अशी भोगवटा प्रमाणपत्रे देण्यात आल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. तसेच कणकवली शहरामध्ये अनधिकृत बांधकामांना ऊत आला आहे याला जबाबदार हे अधिकारी आहेत.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मी त्या माहितीतील एका बांधकामाची परवानगी, बांधकामाचा नकाशा तसेच भोगवटा प्रमाणपत्र यांची मागणी नगरसेवक या नात्याने केली होती. मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला. वास्तविक मी नगरसेवक आहे. या शहराचा विश्वस्त म्हणून मला माहिती देण्यास टाळाटाळ करणारे हे अधिकारी सामान्य माणसाला काय वागणूक देत असतील याची कल्पनाही करवत नाही.नकाशा, परवाना आणि भोगवटा प्रमाणपत्र देताना मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आम्हाला संशय आहे. अनेक नागरिकांनी तशा तक्रारी केल्या आहेत. हे दोन्ही अधिकारी आपल्या वर्तणुकीतून त्या संशयाला पुष्टी देत आहेत. त्यामुळे त्यांची सखोल चौकशी करावी . त्यामुळे शहरातील अनेक गैरप्रकार उघडकीस येतील अशी आम्हाला खात्री आहे. त्यासंबंधातील पुरावे आवश्यकता भासल्यास आम्ही सादर करु.मयूर शिंदे हे आपली इतरत्र बदली करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र , त्यांची बदली झाल्यास इतरत्रही असेच प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करावा आणि शहरे विद्रुप करणाऱ्या या अधिकाऱ्यांना कडक शासन करावे, अशी मागणीही आम्ही केली आहे. असेही कन्हैय्या पारकर यांनी या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Kankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्गMuncipal Corporationनगर पालिका