शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेबाबत 1950 क्रमांकावर तक्रार करा, शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 15:54 IST

आचारसंहितेबाबत नागरिकांना तक्रार करावयाची असेल तर 1950 या क्रमांकावर तक्रार करता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल चव्हाण यांनी येथील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी वर्गाच्या बैठकीत केले.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सभागृहातील शासकीय अधिकाऱ्यांची बैठकसजगतेने, समन्वयाने सर्वांनी निवडणूक कामकाज करावे  : सुनिल चव्हाण

सिंधुदुर्गनगरी : निवडणूकी संदभार्तील कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सजगतेने व समन्वयाने कामकाज पार पाडावे, आचारसंहितेबाबत नागरिकांना तक्रार करावयाची असेल तर 1950 या क्रमांकावर तक्रार करता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल चव्हाण यांनी येथील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी वर्गाच्या बैठकीत केले.बैठकीस सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक निमित गोयल, रत्नागिरीचे अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी जयकृष्ण फड, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, सर्व उपविभागीय अधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी, नोडल आॅफिसर आदी अधिकारी उपस्थित होते.लोकशाहीच्या जागरात महत्वपूर्ण भूमिका व जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळत आहे या दृष्टीकोनातून निवडणूकीच्या कामाकाजाकडे पहावे असे सूचित करुन  चव्हाण म्हणाले की, या बैठकीत विविध कमिट्यांची व विविध कार्यालयीन अधिकारी वगार्ची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, निवडणूक संदर्भात कायदे, आदर्श आचार संहितेबाबत घ्यावयाची खबरदारी, सभा, मिरवणूक, लाऊड स्पीकर आदी परवानग्या देण्याची पद्धती आदी बाबत पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून सर्वांना माहिती दिली जाईल. याचा अभ्यास करावा व समन्वयाने सर्व कामकाज पार पाडावे.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी पी.पी.टी च्या माध्यमातून आदर्श आचार संहिता, विविध पथकांची कार्यप्रणाली, निवडणूक विषयक कायदे व भंगाबाबतच्या शिक्षा या बाबत सविस्तर माहिती दिली.जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी नागरिकांना त्रास होईल किंवा त्यांचे सण, धार्मिक सण साजरे करताना आदर्श आचार संहिता पालनाबाबत कटाक्षाने लक्ष घालावे. पण जे आचार संहितेत नाही त्याचा बाऊ करुन नागरिकांना नाहक त्रास देणे टाळावे.

सेक्टर आॅफिसरनी केवळ मतदान केंद्रापुरते लक्ष न देता त्याच्या परिसराचा सुद्धा सखोल अभ्यास करावा अशा सूचना या बैठकीत केल्या. शेवटी उप जिल्हा निवडणूक अधिकारी जयकृष्ण फड यांनी आभार मानले. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsindhudurgसिंधुदुर्ग