शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कस्टडीतील मृत्यू रोखण्यासाठी समिती  - दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 22:12 IST

 सावंतवाडी - सांगली येथील घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, पोलीस कोठडीतील मृत्यू रोखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिका-यांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती येत्या पंधरा दिवसात शासनाला अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे दीपक केसरकर यांनी दिली. यावेळी त्यांनी आंबोलीसाठी स्वतंत्र असे टुरिझम पोलीस ठाणे ...

 सावंतवाडी - सांगली येथील घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, पोलीस कोठडीतील मृत्यू रोखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिका-यांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती येत्या पंधरा दिवसात शासनाला अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे दीपक केसरकर यांनी दिली. यावेळी त्यांनी आंबोलीसाठी स्वतंत्र असे टुरिझम पोलीस ठाणे तयार करण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव शासनाने मागविला आहे, असेही  त्यांनी स्पष्ट केले.मंत्री दीपक केसरकर हे रविवारी शासकीय बैठकीसाठी सावंतवाडीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, आरोग्य अधिकारी योगेश साळे, तहसीलदार सतीश कदम, रूपेश राऊळ आदी उपस्थित होते.मंत्री केसरकर म्हणाले, सांगली येथील घटनेनंतर शासन पोलीस कस्टडीतील मृत्यू रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय करीत आहेत. त्यासाठी मुंबईत वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची एक बैठक झाली. या बैठकीत पुढील पंधरा दिवसात कस्टडीतील मृत्यू रोखण्यासाठीच्या उपाययोजना आखण्याबाबत आदेश दिले आहेत. हा अहवाल आल्यानंतर शासन त्यांच्यावर उचित असा निर्णय घेईल, असे मंत्री केसरकर म्हणाले. तसेच अहमदनगर घटनेबाबतही एखाद्या शेतकºयावर गोळीबार करणे चुकीचे आहे. पण अशी आंदोलने होत असतील, तर त्यातून मार्ग काढण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी बैठक घ्यावी, असे सूचित करण्यात आले आहे. गोळीबारापर्यंत विषय येऊ नये याची काळजी घ्या, अशा सूचना करण्यात आल्याचेही ते म्हणाले.आंबोली येथील कावळेसाद पॉर्इंट येथील दरीत चार मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेची दखल घेत आम्ही आंबोलीत आणखी एक तपासणी नाका लावण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे हा नाका लावण्यात आला आहे. तसेच गस्तही वाढविण्यात आली आहे. मात्र एवढ्यावरच शासन थांबणार नाही, तर माथेरान तसेच अन्य पर्यटन स्थळांवर ज्या प्रमाणे स्वतंत्र पोलीस ठाणी आहेत, तसे पोलीस ठाणे आंबोलीत निर्माण करण्यात येणार आहे. हे पोलीस ठाणे पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचे असल्याने ‘टुरिझम पोलीस’ ही संकल्पना आंबोलीत रूजविण्यात येईल, असेही यावेळी मंत्री केसरकर यांनी सांगितले. त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून मागविण्यात आला आहे. तो प्रस्ताव आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येईल व लवकरात लवकर त्याची मंजुरी घेऊ, असेही मंत्री केसरकर यांनी यावेळी सांगितले.कोल्हापूर येथील महिला पोलिस अधिकारी गेले दीड वर्ष बेपत्ता आहे. त्याबाबत माझ्याकडे रितसर तक्रार आली तर त्यावर अधिक भाष्य करेन, असे सांगत याची मी स्वत: माहितीही घेईन आणि यात काय करता येईल हे तपासून बघितले जाईल, असे यावेळी मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार