शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गमधील विकृती नष्ट करण्यासाठी एकत्र या!, विनायक राऊत यांचे आवाहन 

By सुधीर राणे | Updated: June 22, 2023 15:36 IST

श्रीधर नाईक यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त कणकवली नरडवे तिठा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा हा विचारवंतांचा व संस्कृतीचे संवर्धन करणारा आहे. बॅ. नाथ पै, मधू दंडवते, सुरेश प्रभू अशा विचारवंतांना सिंधुदुर्गवासीयांनी खासदार म्हणून नेतृत्व करण्याची संधी दिली. मात्र, अलीकडच्या काळात जिल्ह्यात राजकीय दहशतवाद व दादागिरी ही विकृती फोफावत चालली आहे. या विकृतीने विचारी व परोपकारी श्रीधर नाईक यांचा बळी घेतला. त्यामुळे ही विकृती नष्ट करण्यासाठी सिंधुदुर्गवायांनी एकत्र यावे असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी येथे केले.श्रीधर नाईक यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त कणकवली नरडवे तिठा येथे आदरांजली कार्यक्रम, रक्तदान शिबीर , बचतगटांच्या महिलांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन नाईक कुटुंबीय व श्रीधर प्रेमींनी केले होते. यावेळी खासदार विनायक राऊत बोलत होते. यावेळी  आमदार वैभव नाईक, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अरुण दुधवडकर, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपाध्यक्ष अनंत पिळणकर, काँग्रसेचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,नीलम सावंत-पालव, मुरलीधर नाईक, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख तथा श्रीधर नाईक यांचे सुपुत्र सुशांत नाईक, संकेत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.खासदार राऊत म्हणाले,  श्रीधर नाईक यांच्या समाजसेवेचा वारसा त्यांचे सूपुत्र सुशांत नाईक, संकेत नाईक, पुतणे आमदार वैभव नाईक समर्थपणे पुढे नेत आहेत. नाईक कुटुंबीय सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून श्रीधर नाईक यांच्या स्मृती जपण्याचे काम करीत आहेत. सुशांत नाईक हे युवासेनेचे काम करीत असून त्यांना चांगले राजकीय भवितव्य निश्चितच असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.आमदार वैभव नाईक यांनी श्रीधर नाईक यांच्या कार्याचा वसा आम्ही पुढे नेत राहिलो, त्यामुळे मी आमदार होऊ शकलो असे मत व्यक्त केले.पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहत नाही याची खंतसिंधुदुर्गात फोफावलेल्या अपप्रवृतीविरोधात श्रीधर नाईक यांनी संघर्ष केला. कार्यकर्ता पक्षासाठी जीवाचे रान करून पक्षवाढीसाठी कार्य करतो. मात्र, त्याच्या पाठिशी खंबीरपणे  पक्ष उभा राहत नाही, अशी खंत व्यक्त करतानाच श्रीधर नाईक यांच्याबाबतीत हेच घडले. जिल्ह्यात सध्या आसूरी शक्ती वाढत असून या शक्तीचा बीमोड करण्यासाठी श्रीधर नाईक प्रेमींनी एकत्र यावे, असे आवाहन सुधीर सावंत यांनी केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत