शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आव्हानाची पोकळ भाषा करण्यापेक्षा रणमैदानात या : राजन तेली यांचे प्रति आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 17:59 IST

Politics, Narayan Rane, Rajan Teli, sindhudurg खासदार नारायण राणेंना आव्हान देण्याची स्वतःची योग्यता आहे का ? हे सतीश सावंत व संजय पडते यांनी स्वतःच्या अंतरात्म्याला विचारून पहावे. पण बहुधा उद्धवसेनेत जाताना स्वतःचा अंतरात्मा विकूनच तिथे प्रवेश मिळत असावा असे वाटते. आमदार नितेश राणे यांच्या राजीनाम्याने राणेंच्या हद्दपारीची एवढी तुम्हाला घाई का आहे ? अशी मागणी करण्यापेक्षा पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणमैदानात या. असे प्रतिआव्हान भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिले आहे.

ठळक मुद्देआव्हानाची पोकळ भाषा करण्यापेक्षा रणमैदानात या : राजन तेली यांचे प्रति आव्हान सतीश सावंत, संजय पडते यांना प्रत्युत्तर

कणकवली : खासदार नारायण राणेंना आव्हान देण्याची स्वतःची योग्यता आहे का ? हे सतीश सावंत व संजय पडते यांनी स्वतःच्या अंतरात्म्याला विचारून पहावे. पण बहुधा उद्धवसेनेत जाताना स्वतःचा अंतरात्मा विकूनच तिथे प्रवेश मिळत असावा असे वाटते. आमदार नितेश राणे यांच्या राजीनाम्याने राणेंच्या हद्दपारीची एवढी तुम्हाला घाई का आहे ? अशी मागणी करण्यापेक्षा पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणमैदानात या. असे प्रतिआव्हान भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिले आहे.याबाबत राजन तेली यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नीतेश राणे हे सतीश सावंत व संजय पडते यांच्या पक्षप्रमुखांच्या नाकावर टिच्चून कणकवलीतून निवडून आले आहेत. या जिल्ह्यातील त्यांच्या दोन्ही आमदारांच्या एकत्र मताधिक्यापेक्षाही अधिक मताधिक्य घेऊन त्यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांचे आव्हान आम्ही कधीही स्वीकारून नीतेश राणेंना राजीनामा द्यायला सांगू. तसेच त्यांना पुन्हा मैदानात उतरवू . पण भाजपाच्या जीवावर बांडगुळासारखे उगवलेले तुमचे खासदार आणि दोन्ही आमदार यांनीही राजीनामा देऊन पुन्हा एकदा त्यांच्या बरोबरीने निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवावी. चारही निवडणूका लढवूया. म्हणजे एकदा काय ते होऊनच जाऊ दे.यापुढे जनता कोणाची हद्दपारी करणार हे सुद्धा त्यातून दिसेलच.फक्त बालिश बडबड करण्यापेक्षा आमचे हे आव्हान स्वीकारा आणि तुमच्या इथल्या आमदार-खासदारांच्या राजीनाम्याचा एकदा काय तो मुहूर्त ठरवा. आपल्या कामातून जनतेशी विश्वासाची नाळ जोडले गेलेले आमदार नितेश राणे मैदानात उतरायला कधीही सज्जच असतील.

सावंत व पडते यांनी आव्हानबाजी करण्यापूर्वी एकदा शिवसेना नक्की आहे कुठे ? याचा अभ्यास करावा. उगाच दंडाच्या नसलेल्या बेटक्या फुगवत बसू नये. खासदार विनायक राऊत तसेच वैभव नाईक व दीपक केसरकर हे दोन्ही आमदार केवळ भाजपाशी असलेल्या युतीमुळेच जनतेतून निवडून आले आहेत. कणकवलीमध्ये सतीश सावंत यांनी गद्दारी केली आणि तिथे शिवसेनेने त्यांना पक्षाचे अधिकृत चिन्ह देऊन गद्दारीला मान्यताही दिली. तरीही नितेश राणे निवडून आले . हे विसरू नका.असेही या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणे Rajan Teliराजन तेली sindhudurgसिंधुदुर्ग