शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

रंगीत तालीम प्रशासनाच्या अंगलट, चेंगराचेंगरीत एक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 7:57 PM

सलग तीन स्फोट ... भीषण आवाज...जनतेचा एकच आक्रोश...चहूबाजूंनी आरडाओरड...पळापळ...परिणाम एकच चेंगराचेंगरी....! आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयात राबवलेल्या रंगीत तालीमचा फटका येथील प्रशासकीय कामानिमित्त आलेल्या वृद्ध, दिव्यांग, गरोदर माता यांना बसला.

सिंधुदुर्गनगरी : सलग तीन स्फोट ... भीषण आवाज...जनतेचा एकच आक्रोश...चहूबाजूंनी आरडाओरड...पळापळ...परिणाम एकच चेंगराचेंगरी....! आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयात राबवलेल्या रंगीत तालीमचा फटका येथील प्रशासकीय कामानिमित्त आलेल्या वृद्ध, दिव्यांग, गरोदर माता यांना बसला. या प्रकारानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत सरंबळ येथील एकनाथ सखाराम कदम हे पायदळी तुडवले गेल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना त्वरित जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी व संबंधित अधिका-यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी उपस्थित शेकडो नागरिकांमधून व्यक्त होत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून रंगीत तालीम करून प्रशासन व संबंधित यंत्रणा किती सजग आहे, याचे प्रात्यक्षिक घेतले जाते. तशीच एक रंगीत तालीम जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी भर दुपारी आपत्ती व्यवस्थापन विभागाने करायचे ठरवले. दुपारी एकच्या सुमारास बाँब स्फोटसदृश एक भलामोठा आवाज झाला. सगळीकडे आरडाओरड सुरू झाली. बघता बघता तीन स्फोट झाले.आग लागली, पळा पळा असे म्हणत उपस्थित शेकडो कर्मचा-यांनी कार्यालयाच्या बाहेर पडण्यास सुरुवात केली. जे नागरिक इमारतीच्या पहिल्या मजल्यावर होते, त्यांची तर तारांबळ उडाली. जिवाच्या आकांताने लोक पळत सुटले. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिला ओरडून मोकळ्या जागेत जाण्यासाठी धडपडत होते. पहिल्या मजल्यावर चिंचोळ्या भागातून बाहेर पडताना नागरिकांची अक्षरश: चेंगराचेंगरी झाली. या घटनेत कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथील एकनाथ सखाराम कदम यांना नागरिकांनी पायदळी तुडवले. सर्वत्र हाहाकार माजला.अवघ्या काही मिनिटांत जिल्हाधिकारी इमारतीतील सर्व कर्मचारी, अधिकारी व नागरिक मोकळ्या जागेत आले. याच दरम्यान सिंधुदुर्गनगरीतील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेत सायरन वाजल्याने सर्वत्र भीतिदायक वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, डॉग स्कॉड, रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या.एकनाथ कदम जायबंदीरंगीत तालीम करतेवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत सरंबळ येथील एकनाथ कदम हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कदम यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कदम हे एकटेच असून त्यांना कोणीही नातेवाईक नाही. असे असतानाही प्रशासनाने दुपारपर्यंत चौकशीसाठी साधा फोनसुद्धा केला नसल्याची खंत व्यक्त होत होती.रंगीत तालीम, मात्र मार्गदर्शन करणारे पथकच नाहीआपत्ती व्यवस्थापन विभागाने रंगीत तालीम घेताना कोणतीही खबरदारी घेतली नसल्याचे आजच्या या चेंगराचेंगरी वरून स्पष्ट झाले. या तालमीदरम्यान गोंधळलेल्या कर्मचारी व नागरिकांना यावेळी काय करावे याबाबतचे मार्गदर्शन करणारे आपत्ती व्यवस्थापनचे पथक अथवा कर्मचारी घटनास्थळी उपस्थित नव्हते. त्यामुळे या विभागाच्या हलगर्जीपणाबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर