शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

शेजवलीत ५ एकर जागेत सामूहिक शेती, पिढ्यान्पिढ्यांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 17:15 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या शेजवली (जि. रत्नागिरी) गावात एक आगळीवेगळी परंपरा पहायला मिळते. गावातील सर्वजण एकत्रित येऊन सुमारे ५ एकर जागेत उन्हाळी व पावसाळी शेती करतात. यातून मिळणारे उत्पन्न गावातील मंदिरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी वापरले जाते. ही परंपरा पिढ्यान्पिढ्या चालत आली आहे, अशी माहिती रवी पवार यांनी दिली.

ठळक मुद्देशेजवलीत ५ एकर जागेत सामूहिक शेती, पिढ्यान्पिढ्यांची परंपरा मिळणारे उत्पन्न मंदिरातील विविध कार्यक्रमांसाठी

निकेत पावसकरतळेरे (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या शेजवली (जि. रत्नागिरी) गावात एक आगळीवेगळी परंपरा पहायला मिळते. गावातील सर्वजण एकत्रित येऊन सुमारे ५ एकर जागेत उन्हाळी व पावसाळी शेती करतात. यातून मिळणारे उत्पन्न गावातील मंदिरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी वापरले जाते. ही परंपरा पिढ्यान्पिढ्या चालत आली आहे, अशी माहिती रवी पवार यांनी दिली.याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, शेजवली गावात स्थानेश्वर देव व निनादेवी मंदिराची ५ एकर जागा आहे. या जागेवर मधलीवाडी, भटवाडी, वरचीवाडी या वाडीतील प्रत्येक गावातील एक-दोन माणसे एकत्रित येऊन उन्हाळी व पावसाळी शेती करतात. दरवर्षी पावसाळी शेती करायला १५ ते २० जोते असतात. यावर्षी १५ जोते होती. तर काम करायला लहानांपासून वृद्धापर्यंत सुमारे ४५ माणसे होती.मशागतीपासून शेतीच्या कामाला सुरुवात होते. गावात शेतीच्या कामाला सुरुवात याच जागेवर मशागत करून केली जाते. मशागतीपासून प्रत्यक्षात उत्पन्न मिळेपर्यंत सामूहिक सहभाग दिसून येतो. यावर्षी १५ किलो बियाणे पेरले असून शेती करायला ३ दिवस लागले.

ही जमीन पाणथळ असल्याने तिथे उशिरा शेती केली जात असल्याचे पवार यांनी सांगितले. मागील पाच वर्षांपासून निनादेवी मंदिरात नियमित दर मंगळवारी महाप्रसाद असतो. त्यासाठीही या शेतीतून मिळणारे उत्पन्न वापरले जाते. ही सामूहिक शेती केव्हापासून सुरू आहे हे कोणालाही माहीत नाही.उत्सवात लागणारा तांदुळ याच शेतीतून पिकतोया मंदिरात वार्षिक सर्व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. शिमगा, नवरात्र, देवदिवाळी, दसरा, त्रिपुरारी पौर्णिमा, आषाढी आणि कार्तिकी एकादशी असे विविध सण साजरे केले जातात. याशिवाय निनादेवीचा २६ एप्रिलला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.यावेळी महाप्रसादासाठी लागणारे तांदुळ या शेतीतील उत्पन्नामधून घेतले जातात. उर्वरित तांदुळ ज्यांची शेती नाही अशांना विक्री केली जाते. याच जमिनीवर कुळीथ, मूग आणि मटकीची शेती केली जाते. यावर्षी पेरलेल्या १५ किलो बियाण्यांपासून सुमारे ४0 मण भात मिळेल, अशी माहिती पवार यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग