शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या संपाचा तळेरे बाजारपेठेला फटका, बाजारपेठेत शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 18:09 IST

एस. टी. कर्मचार्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून केलेल्या बेमुदत संपाचा तळेरे बाजारपेठेला मोठा फटका बसला. ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरू असलेल्या या संपामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. या संपामुळे मंगळवारी दिवसभर एस. टी. स्थानकावरही शुकशुकाट होता.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांचे प्रचंड हालदिवाळीसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या विक्रेत्यांना संपाचा फटका सजावटीच्या वस्तू, आकाशकंदील, फळे, कपडे, भाजी विक्रेत्यांची नाराजी

तळेरे , दि. १७ :  एस. टी. कर्मचार्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून केलेल्या बेमुदत संपाचा तळेरे बाजारपेठेला मोठा फटका बसला. ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरू असलेल्या या संपामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. या संपामुळे मंगळवारी दिवसभर एस. टी. स्थानकावरही शुकशुकाट होता.

तळेरे बाजारपेठेत दर मंगळवारी परिसरातील सुमारे ३० ते ३५ गावचे ग्राहक खरेदीसाठी येतात. यामध्ये बहुतेक ग्राहक हे ग्रामीण भागातून येणारे असतात. याशिवाय तळेरेचा बाजार हा ऐन सणाच्या निमित्ताने दरवेळीच भरलेला असतो. यावेळी मात्र उलट परिस्थिती पहायला मिळाली.

बुधवारी दीपावली असल्यामुळे हा आठवडा बाजार चांगला भरेल अशी अनेक विक्रेत्यांची अपेक्षा होती. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर एस. टी. कर्मचार्यांनी केलेल्या संपाचा फटका या बाजाराला चांगलाच बसला. या आठवडा बाजाराला दिवाळी व भाऊबीजसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी आल्या होत्या.

मात्र सकाळ, दुपार व सायंकाळीही बाजारात अपेक्षेएवढी गर्दी दिसत नव्हती. दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध सजावटीच्या वस्तू, आकाशकंदील, फळे, कपडे, भाजी अशा विविध प्रकारच्या विक्रेत्यांना या संपाचा जोरदार फटका बसला.

त्यातही काही ठिकाणचे वृद्ध सकाळी येताना बाजारात आले, मात्र बाजार घेतल्यानंतर पुन्हा घरी जायला वाहन नसल्याने त्यांची मोठी गैरसोय झाल्याचेही पहायला मिळाले.

टॅग्स :ST Strikeएसटी संपkonkanकोकण