शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

सिंधुदुर्गात ढगफुटीसदृश पाऊस; कुडाळची भंगसाळ नदीचे पाणी आले रस्त्यावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2022 18:10 IST

कुडाळ शहराच्या बाजूनं वाहणाऱ्या भंगसाळ नदीला पूर आला असून नागरिकांच्या घरातही पाणी घुसले.

सिंधुदुर्ग-  काल संध्याकाळपासून सुरु झालेल्या दमदार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपले. जिल्ह्यात सर्वच नद्यांना पूर आला. सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. मध्यरात्री १ नंतर तुफान पाऊस, कुडाळ शहरातील गुलमोहोर हॉटेलनजीक पाणी रस्त्यावर आले. तसेच शहरातील वाहतूक अन्य मार्गाने वळविली पावसाची तुफान बॅटिंग आजही कायम राहण्याची शक्यता आहे.

कुडाळ शहराच्या बाजूनं वाहणाऱ्या भंगसाळ नदीला पूर आला असून नागरिकांच्या घरातही पाणी घुसले. तर कुडाळ गुलमोहोर हॉटेल ते नवीन एसटी स्टॅन्ड हा मार्ग पाणी आल्याने बंद झाला. काल संध्याकाळपासून सिंधुदुर्गात जोरदार पाऊस सुरु असून रात्री १ पासून या पावसानं नॉनस्टॉप बॅटिंग सुरु केली. जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला असून भातशेती पाण्याखाली गेली.

हातेरी, पीठढवळ, निर्मला, गडनदी, सुख नदी, तेरेखोल नद्यांची पातळी वाढली असून नजीकच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. कुडाळ शहरानजीक असलेल्या भंगसाळ नदीचे पाणी काळप नाका परिसरात घुसल्याने येथील भंगारविक्रत्यांच्या घरात पाणी घुसले. यामुळे त्यांचे भंगार सामान वाहून गेले.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूरsindhudurgसिंधुदुर्ग