शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेतील मटक्याचे अड्डे बंद करा, तरूण पिढी गुरफटतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 17:01 IST

बाजारपेठेतील शासकीय गोदामासमोर चालणाऱ्या मटका व्यवसायाविरोधात शहरातील गोपाळनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष निकम यांनी आवाज उठविला आहे. राजरोस चाललेल्या मटक्यामुळे तरुण पिढी बरबाद होत असल्याने शहरातील मटक्याच्या अड्ड्यांवर तातडीने कारवाई करून ते कायमस्वरुपी बंद करावेत, अशी मागणी निकम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देबाजारपेठेतील मटक्याचे अड्डे बंद करा, तरूण पिढी गुरफटतेय गोपाळनगर मित्रमंडळाच्या अध्यक्षांचे पोलिसांना निवेदन

वैभववाडी : बाजारपेठेतील शासकीय गोदामासमोर चालणाऱ्या मटका व्यवसायाविरोधात शहरातील गोपाळनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष निकम यांनी आवाज उठविला आहे. राजरोस चाललेल्या मटक्यामुळे तरुण पिढी बरबाद होत असल्याने शहरातील मटक्याच्या अड्ड्यांवर तातडीने कारवाई करून ते कायमस्वरुपी बंद करावेत, अशी मागणी निकम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.वैभववाडी बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शासकीय गोदामासमोर मुख्य रस्त्यालगत मटका व्यवसाय तेजीत चालला आहे. या मटक्यात लहान मुले, तरुण ते अगदी वयोवृध्द गुरफटले आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. मटक्याच्या नादी लागलेली शाळकरी मुले व बेकार तरुण पैशासाठी घरात भांडणे करीत असल्याने अनेकांचे कौटुंबीक स्वास्थ्य बिघडत चालले आहे.परंतु, अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त करणाऱ्या मटक्यांच्या अड्ड्यांत दिवसेदिंवस वाढ होत आहे. त्यामुळे शहरात वाढत असलेले मटका अड्डे तत्काळ बंद करण्यात यावेत. हे सर्व अड्डे मुख्य रस्त्यालगत असल्यामुळे महिलांना शहरातून फेरफटका मारताना या मटका अड्ड्यांचा नाहक मनस्ताप होत आहे.

त्यामुळे बाजारपेठेतील मटका व्यवसायावर कारवाई करून तो कायमस्वरुपी बंद करावा, असे निकम यांनी निवेदनात म्हटले आहे. अशा प्रकारच्या अवैध व्यवसायामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. त्यामुळे यावर निर्बंध घालणे आवश्यक बनले आहे. तशी मागणीही होत आहे.खुलेआम मटक्यावर कारवाई का नाही ?शहरात जागोजागी खुलेआम मटका सुरू असल्याचे नागरिकांच्या नजरेस पडते. किंबहुना ही पोलिसांनाही माहिती आहे. विशेष म्हणजे काही तरुण याकडे मिळकतीचे साधन म्हणून अधिकाधिक गुरफटताना दिसून येत आहे. तरीही सर्वश्रृत असलेल्या मटक्याच्या अवैध व्यवसायावर पोलीस कारवाई नेमकी कशामुळे करीत नसावेत? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सतत घोळत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग