शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
3
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
4
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
5
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
6
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
7
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
8
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
9
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
10
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
11
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
12
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
13
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
14
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
15
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
16
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
17
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
18
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
19
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
20
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )

कसई-दोडामार्ग नगरपंचायत मासिक सभा बैठकीत उपनगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष यांच्यात खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 17:33 IST

विकासकामांच्या मुद्यावरूनही गरमागरम चर्चा झाली. विकासकामांची मुदत संपून बराच कालावधी झाला. वर्कआॅर्डरची मुदत संपली. परंतु ठेकेदार कामे करीत नाहीत. यामुळे विकास प्रक्रिया मंदावल्याने ठेकेदारावर काय कारवाई करणार ते सांगा, असे नानचे यांनी विचारले.

ठळक मुद्दे विविध विषयांवरून सभा चांगलीच गाजली;भ्रष्ट ठेकेदारास काळ्या यादीत टाकाकसई-दोडामार्ग नगरपंचायतीची मासिक सभा

दोडामार्ग : कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण व माजी नगराध्यक्ष संतोष नानचे या सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांतच विविध विषयांवरून खडाजंगी झाल्याने नगरपंचायतीची मासिक बैठक चांगलीच वादळी ठरली. सभाशास्त्राला धरून नानचे बोलत नसल्याचा आरोप करीत ह्यतुमच्यावर मी कायद्याच्या अधिकारात कारवाई करू शकतोह्ण, असा इशारा चव्हाण यांनी देताच तुम्ही मला बोलण्यापासून रोखू शकत नाहीत. हिंमत असेल तर कारवाई करून दाखवाचह्ण असे प्रतिआव्हान नानचे यांनी दिल्याने सभागृहात काही काळ तणाव निर्माण झाला.

कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा लीना कुबल या बैठकीस उपस्थित नसल्याने उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी मुख्याधिकारी वैभव साबळे, शिक्षण व आरोग्य सभापती संतोष म्हावळणकर, बांधकाम सभापती प्रमोद कोळेकर, नगरसेवक संतोष नानचे, राजेश प्रसादी, सुधीर पनवेलकर, दिवाकर गवस, रामचंद्र ठाकूर, नगरसेविका सुषमा मिरकर, साक्षी कोरगावकर, आदिती मणेरीकर, डॉ. वंदना कुलकर्णी आदी उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीलाच माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी मासिक बैठक लावण्यास का विलंब झाला? याबाबत जाब विचारला. आचारसंहिता संपून बराच कालावधी झाला. परंतु बैठक लावली गेली नाही. वास्तविक ही बैठक आचारसंहिता संपल्यानंतरची दुसरी बैठक असायला हवी होती. अशी टिपणी करीत विलंबामागचे कारण सांगावे, अशी मागणी सभागृहात केली.त्यावर उपनगराध्यक्ष चव्हाण यांनी याचे उत्तर तुम्हांला नगराध्यक्ष देऊ शकतील. मी देऊ शकत नाही. त्या अनुपस्थित असल्याने या सभेचा मी अध्यक्ष आहे, असे उत्तर दिले.

त्यावर बोलताना नानचे यांनी आपण आपली जबाबदारी टाळत आहात, असा आरोप करीत गतिमान विकास व्हायचा असेल तर बैठका वेळेत व्हायला हव्या. लोकांच्या आमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत, असे सांगितले. या मुद्यावरून दोघांतही चांगलीच खडाजंगी झाली. अखेर मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी बैठक घेण्यास दिरंगाई झाल्याबाबत दिलगिरी व्यक्त करीत, यापुढे काळजी घेतली जाईल असे सांगितल्यावर वादावर पडदा पडला.

शहरातील विकासकामांच्या मुद्यावरूनही गरमागरम चर्चा झाली. विकासकामांची मुदत संपून बराच कालावधी झाला. वर्कआॅर्डरची मुदत संपली. परंतु ठेकेदार कामे करीत नाहीत. यामुळे विकास प्रक्रिया मंदावल्याने ठेकेदारावर काय कारवाई करणार ते सांगा, असे नानचे यांनी विचारले. तर नगरसेवक राजेश प्रसादी यांनी लिंगायत दफनभूमीचे काम वर्कआॅर्डर संपूनही पूर्ण झाले नाही. हे सभागृहाच्या लक्षात आणून देत सर्वात भ्रष्ट ठेकेदार असल्याचा आरोप केला. अशा ठेकेदारास काळ्या यादीत टाका, अशी मागणी मनसेचे नगरसेवक रामचंद्र ठाकूर यांनी केली. शहरात प्लास्टिकबंदी करण्याच्या उद्देशाने उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी प्लास्टिक वापरकर्त्यांवर कारवाई करण्याचा इशारा प्रसार माध्यमांच्यामार्फत दिल्याचा मुद्दा नानचे यांनी सभागृहात उपस्थित केला. प्लास्टिकबंदीला आमचा विरोध नाही. पण त्या अगोदर व्यापारी, नागरिक यांची बैठक झाली. त्या बैठकीत जनजागृती करा. कापडी पिशव्या किंवा इतर साहित्य द्या आणि मगच प्लास्टिक बंदीचा निर्णय घ्या, असे सुचविण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी न करता प्लास्टिक वापरकर्त्यांवर कारवाईची धमकी देणे चुकीचे आहे.चव्हाण यांनी ह्यतुम्ही सभा शास्त्रानुसार बोलत नसून मला कायद्याचा अधिकार वापरायला लावू नकाह्ण, असे सूचक वक्तव्य केले. त्यावर नानचे यांनी ह्यतुम्ही मला रोखू शकत नाही. तुम्ही कारवाई करून दाखवा असे प्रतिआव्हान दिले. अखेर मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी प्लास्टिकबंदीबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकणpanchayat samitiपंचायत समिती