शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्याच्या प्रकाशात क्लाराची उंच भरारी, बारावी परीक्षेत अव्वल येण्याचा मान मिळविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 14:47 IST

भविष्यात ‘परिचारिका’ (नर्स) बनून रूग्णसेवा करायची आहे.

- वैभव साळकर दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : जिद्द, चिकाटी आणि काहीतरी करून दाखविण्याचे ध्येय समोर असले की अनंत अडचणी वाटेत आल्या तरी त्यावर मात करीत यश मिळविण्याचा आनंद काही औरच असतो. याचेच एक उदाहरण म्हणजे कोनाळकट्टा येथील क्लारा फर्नांडिस. घरची परिस्थिती बिकट, निवाऱ्यासाठी झोपडीवजा घर, घरात वीजेची सोय नाही. अशा ना ना अडचणी असूनही क्लाराने दिव्याचा अंधुक प्रकाशावर अभ्यास करून दोडामार्ग कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतून ७८.४६ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात अव्वल येण्याचा मान मिळविला आहे.तिला भविष्यात ‘परिचारिका’ (नर्स) बनून रूग्णसेवा करायची आहे. तिमिराहूनी तेजाकडे जाण्याचा तिचा प्रयत्न आहे. मात्र अव्वल यश मिळवूनही केवल परिस्थितीमुळे भविष्याची चिंता तिच्यासमोर उभी ठाकली आहे. तिच्या पुढच्या शिक्षणासाठी दानशुरांच्या मदतीचा हात पुढे येण्याची गरज आहे.कोनाळकट्टा येथील क्लारा फर्नांडिस ही एम. आर. नाईक विद्यालय कोनाळकट्टाची विद्यार्थीनी. दहावी पर्यंतचे शिक्षण तिने येथेच पूर्ण केले. घरची परिस्थिती हलाखीची, आई, वडिल मोलमजुरी करून संसाराचा गाढा हाकतात. शिवाय क्लारा बरोबरच तिच्या इतर तीन बहिणींच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे दहावीनंतर शिक्षण घेण्यात क्लाराला अडचणी आल्या. मात्र, सामाजिक कार्यकर्ते संजय सातार्डेकर आणि तिचे शिक्षक अरूण गवस यांनी मदतीचा हात पुढे केल्याने तिने दोडामार्ग कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश मिळविला.सातार्डेकर यांनी तिच्या एसटी बसच्या पासचा खर्च उचलला. तर गवस यांनी शाळेसाठी येणारा इतर खर्च दिला. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचे क्लाराचे स्वप्न पूर्ण झाले. घरात वीजेची सोय नसल्याने रॉकेलच्या दिव्याच्या अंधुक प्रकाशात रात्री जागवून अभ्यास केला. आणि दोडामार्ग कनिष्ठ महाविद्यालयात  अव्वल येण्याचा मानही मिळविला. तिला परिचारिका बनून रूग्णांची सेवा करावयाची इच्छा आहे. उत्तीर्ण झाल्याचा आनंद तिला नक्कीच आहे. मात्र त्याचबरोबर भविष्यातील शिक्षणाची चिंता देखील तिला आता सतावत आहे. उज्ज्वल गुणवत्ता असून सुद्धा आपले स्वप्न पूर्ण होईल की नाही याचा प्रश्न तिच्यासमोर आहे. परिणामी क्लाराच्या या स्वप्नांना पंख देण्यासाठी समाजातील दानशुरांच्या मदतीची तिला गरज आहे.